TRENDING:

मुंबईतील ही 7 ठिकाणं कोणती, जिथं मिळतात सर्वात भारी वडापाव, photos

Last Updated:
स्वस्त आणि खाण्यास सोयीस्कर तसेच भूक लागल्यानंतर पटकन सर्वत्र सहज मिळणारा आणि खमंग, झणझणीत, सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे वडापाव. खवय्यांच्या जीभेला पाणी सोडणारा मुंबईचा स्ट्रीट फूड असलेला वडापाव ‘लोकल टू ग्लोबल’ झाला आहे. सेलिब्रिटी असो की सर्वसामान्य सर्वांचा आवडता खाद्यपदार्थ म्हणून वडापावने मान्यता मिळावली आहे. मुंबईत 8 ठिकाणी अत्यंत बेस्ट वडापाव मिळतात. मग ही 7 ठिकाणी नेमकी कोणती आहेत, हेच आपण आज जाणून घेऊयात. (प्रतिकेश पाटील, प्रतिनिधी, मुंबई)
advertisement
1/7
मुंबईतील ही 7 ठिकाणं कोणती, जिथं मिळतात सर्वात भारी वडापाव, photos
1. अशोक वडापाव – प्रभादेवी जवळी किर्ती कॉलेज जवळील अशोक वडापाव हा मुंबईतील प्रसिद्ध वडापावपैकी एक आहे. गेल्या 35 वर्षांपासून येथे हा वडापाव विकला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील या वडापावचा अस्वाद घेतला आहे. याचसोबत यांचा चुरा वडापाव सुद्धा प्रसिद्ध आहे
advertisement
2/7
2. ग्रॅज्यूएट वडापाव – भायखळा रेल्वेस्थानकाच्या पूर्वेस ग्रॅज्यूएट वडापाव मिळतो. हा वडापाव मुंबईमधील बेस्ट वडापावमधील एक आहे. गेल्या 21 वर्षांपासून बायका स्टेशनवर येणारे प्रवास आणि यासोबत तेथील नागरिक या वडापावचा आस्वाद घेत आहेत.
advertisement
3/7
3. बोरकर वडापाव - गिरगावातील बोरकर वडापाव हा देखील मुंबईमधील प्रसिद्ध वडापाव आहे. या वडापावमध्ये काजू तसेच शेंगदाणे टाकलेले असतात. या वडापावसोबत मिळणारी चटणी खवय्यांना प्रचंड आवडते. गिरगाव चौपाटीवर देखील या वडापावचा आनंद घेता येतो.
advertisement
4/7
4. आराम वडापाव - दक्षिण मुंबईतील सीएसटी, मुंबई महापालिकेच्या समोरचे हे प्राईम लोकेशन आहे. 8 ऑगस्ट 1939 मध्ये म्हणजे अगदी इंग्रजांच्या काळात भाऊ उर्फ श्रीरंग तांबे या मराठी माणसाने हे हॉटेल सुरू केले. आरामचा वडापाव तुम्हाला चीझ, बटर ग्रिल्ड पावसोबत किंवा नुसताही मिळतो. या वड्याची भाजी पांढऱ्या रंगाची असते. तांबे कुटुंबाची तिसरी पिढी हा व्यवसाय सांभाळते. मात्र, वड्याच्या चव आजही तशीच आहे.
advertisement
5/7
5. लाडू सम्राट वडापाव - लाडू सम्राट वडापाव लालबाग परिसरात खूप प्रसिद्ध आहे. या वडापाव सोबत दिली जाणारी खोबऱ्याची चटणीसुद्धा प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे वडापाव मिळतील. यांच्या शाखा मुंबईतील अनेक ठिकाणी आहेत.
advertisement
6/7
6. शिवाजी वडापाव - मिठीबाई कॉलेज जवळील शिवाजी वडापावदेखील लोकप्रिय आहे. अनेक लोकांना या वडापावची चव आवडते. एका दिवसात 1 हजार वडापाव बनवण्याचा या स्टॉलचा विक्रम आहे. भुकेल्या आणि बजेटची कमतरता असलेल्या विद्यार्थ्यांना लक्षात ठेवून या वडापावची निर्मिती केली आहे. तसेच शेझवान आणि चीज शेझवान वडापाव यांसारख्या विविध चवींसह त्यांचा वडापाव या विलेपार्लेतील मिठीबाई कॉलेज भागात खूप प्रसिद्ध आहे.
advertisement
7/7
7. सम्राट वडापाव : विलेपार्ले रेल्वे स्टेशन समोर मिळणारा सम्राट वडापावही फार प्रसिद्ध आहे. या वडापावची खासियत म्हणजे यामध्ये तुम्हाला वडापावबरोबरच मिक्स भजींचाही आस्वाद घ्यायला मिळतो. हा वडापाव खाण्यासाठी लांबून लोक येथे भेट देत असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
मुंबईतील ही 7 ठिकाणं कोणती, जिथं मिळतात सर्वात भारी वडापाव, photos
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल