Aaditya Thackeray: काका आदित्य ठाकरे आणि पुतण्या किआन पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद, PHOTOS समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
मनसे नेते अमित ठाकरे यांचे मेहुणे डॉ. राहुल बोरुडे यांचा नुकताच दिल्लीत विवाह सोहळा संपन्न झाला. दिल्लीत विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर मुंबईतील वेलिंग्टन क्लब इथं स्वागत समारंभ पार पडला. या समारंभासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते.
advertisement
1/10

मराठी भाषेच्या मुद्यावर ठाकरे बंधू एकत्र आलेत. बैठका असो की फॅमिली फंक्शन असेल प्रत्येक ठिकाणी ठाकरे बंधू सह कुटुंब एकत्र पाहण्यास मिळत आहे. अशातच दिल्लीनंतर आता मुंबईत अमित ठाकरे यांचे मेव्हणे डॉ. राहुल बोरुडे यांच्या विवाहाचा स्वागत समारंभ मुंबईत पार पडला. यावेळी ठाकरे कुटुंब एकत्र होतं. यावेळी मात्र काका आदित्य ठाकरे आणि पुतण्या किआनची दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद झाली.
advertisement
2/10
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे यांचे मेहुणे डॉ. राहुल बोरुडे यांचा नुकताच दिल्लीत विवाह सोहळा संपन्न झाला. डॉ. राहुल बोरुडे यांचा विवाह देशाचे लोकपाल अजय खानविलकर यांची कन्या शिवानी खानविलकर यांच्याशी झाला. या विवाह सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितीत लावून नव दाम्पत्याला आशिर्वाद दिले होते.
advertisement
3/10
दिल्लीत विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर आता मुंबईतील वेलिंग्टन क्लब इथं स्वागत समारंभ पार पडला. या समारंभासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते.
advertisement
4/10
उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे आणि किआन ठाकरे यावेळी स्वागत समारंभाला उपस्थितीत होते.
advertisement
5/10
एकीकडे फोटो सेशन सुरू होतं तर दुसरीकडे मात्र काका आदित्य ठाकरे आणि पुतण्या किआन ठाकरे वेगळ्याच मूडमध्ये पाहण्यास मिळाले.
advertisement
6/10
पुतण्या किआन हा मस्त अशा सुटा बुटात समारंभाला आला होता. यावेळी काका आदित्य ठाकरेंसोबत किआन दंगामस्ती करत होता.
advertisement
7/10
आदित्य ठाकरे यांनी किआनला गिव्ह मी फाईव्ह म्हणजे टाळी देण्यासाठी हात पुढे केला अन् फिरकी घेत टाळी दिलीच नाही. पण, टाळी दिल्याशिवाय काही ऐकणार थोडी होता.
advertisement
8/10
या स्वागत समारंभाच्या निमित्ताने पहिल्यांदाच काका आदित्य ठाकरे आणि किआन पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झाले होते. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
advertisement
9/10
यावेळी अमित ठाकरे हे सुद्धा पहिल्यांदाच हटके अशा लूकमध्ये पाहण्यास मिळाले. आदित्य आणि अमित ठाकरे यावेळी गप्पा मारताना फोटो समोर आला.
advertisement
10/10
आदित्य ठाकरे आणि पुतण्या किआन संपूर्ण स्वागत सभारंभामध्ये एकत्र होते. एकीकडे फोटो सेशन सुरू होतं तर दुसरीकडे काका-पुतण्याची जोडी धमाल मस्ती करत होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Aaditya Thackeray: काका आदित्य ठाकरे आणि पुतण्या किआन पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद, PHOTOS समोर