TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस 6 मधील पहिली Wild Card Entry, घरातील सगळ्या सदस्यांची हवा टाईट; कोण आहे तो?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Wild Card : बिग बॉस मराठी सीझन 6 च्या घरातील पहिलं नॉमिनेशन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहिली वाइल्ड कार्ड एंट्री होते आहे. 
advertisement
1/5
'बिग बॉस 6' ची पहिली Wild Card Entry, घरातील सगळ्या सदस्यांची हवा टाईट; आहे कोण?
बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये रविवारी 25 जानेवारीला पहिलं नॉमिनेशन झालं. घरातील सदस्य राधा पाटील घरातून बाहेर पडली. घरातील एक सदस्य कमी झाला. तोच आता नव्या सदस्याची एंट्री होते आहे.
advertisement
2/5
बिग बॉस मराठी सीझन 6 ची पहिली वाइल्ड कार्ड एंट्री, पहिल्या नॉमिनेशनच्या दुसऱ्याच दिवशी पहिली वाइल्ड कार्ड एंट्री होते आहे. याचा प्रोमो समोर आला आहे.
advertisement
3/5
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता बिग बॉसच्या घराचा दरवाजा उघडत असतो. घरातील सगळ्या सदस्यांची धाकधूक वाढलेली दिसते. काहींच्या चेहऱ्यावर नव्या सदस्याला पाहण्याची उत्सुकता तर काही जणांच्या चेहऱ्यावर टेन्शनही दिसतं.
advertisement
4/5
अखेर तो सदस्य घरात येतो आणि सगळ्यांच्या चेहऱ्याचे एक्स्प्रेशन बदलले दिसतात. काही सदस्य विशेषत: प्राजक्ता शुक्रेला खूप आनंद झाल्याचा दिसतो. तर रुचिता जामदारची फुल्ल हवा टाईट झालेली दिसते. सागर कारंडेही शॉक झालेला दिसतो.
advertisement
5/5
असा हा बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्डने आलेला नवा सदस्य असा नेमका आहे तरी कोण? हे जाणून घेण्याची प्रेक्षकांचीही उत्सुकता वाढली आहे. आजच्या भागात ते पाहायला मिळेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस 6 मधील पहिली Wild Card Entry, घरातील सगळ्या सदस्यांची हवा टाईट; कोण आहे तो?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल