TRENDING:

PSL मध्ये तुफान राडा, डेविड वॉर्नर-मोईन एकमेकांच्या अंगावर धावले, नेमकं काय घडलं? VIDEO

Last Updated:

कराची किंग्सचे स्टार खेळाडू डेविड वॉर्नर आणि मोईन अली आपआपसात भिडल्याची घटना घडली आहे.या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
PSL 2026 : पाकिस्तान सुपर लीग 2026 ही दररोज त्याच्या रोमहर्षक सामन्यापेक्षा विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. कधी काही खेळाडू पीएसएलला सोडून आयपीएलमध्ये प्रवेश करतात.तर कधी चेंडू छेडछाडीच्या घटना घडतात.या घटना ताज्या असतानाच आता मैदानात मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे. कराची किंग्सचे स्टार खेळाडू डेविड वॉर्नर आणि मोईन अली आपआपसात भिडल्याची घटना घडली आहे.या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
David warner moeen ali video viral
David warner moeen ali video viral
advertisement

खरं तर काल लाहोरच्या गदाफी स्टेडिअमवर कराची किंगने रावलपिंडीजचा 5 विकेट राखून पराभव केला होता. या सामन्यानंतर खेळाडूंमध्य शेकहँड पार पडणार होते. या दरम्यान कराची किंग्जचे स्टार खेळाडू डेविड वॉर्नर आणि मोईन अली यांच्यात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला होता. दोन्ही खेळाडूंच्या चेहऱ्यावर राग आल्याचे हावभाव आहेत.त्यामुळे मोठा राडा झाल्याची माहिती मिळत आहे.

advertisement

डेविड वॉर्नर मोईन अलीशी काहीतरी बोलत होता, त्याचवेळेस किंग्जे डायरेक्टर हैजर अजहरल मध्येच हस्तक्षेप करतात आणि वाद सोडवताना दिसत आहे.या वरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाल्याचे समजते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डेविड वॉर्नरने या वादावर स्पष्टीकरण दिले आहे.

advertisement

मोईन अली आणि माझ्यात कोणतेही भांडण झाले नाही आहे. ती फक्त एक मजा मस्ती होती,असे कराची किंग्जचे कॅप्टन डेविड वॉर्नरने नंतर सांगितले आहे. हैदर अजहर मला पहिल्यांदा जाऊन प्रतिस्पर्धी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यात सांगत होते, असे डेविड वॉर्नर म्हणाला आहे.पण वॉर्नर त्याच्या ऐवजी मोईनला पाठवण्यास उत्सुक होता. तसेच आमच्यात कुठलेही भांडण झाले नाही आहे,ती फक्त एक मजामस्ती होती,असे वॉर्नरने सांगितले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आरोग्यासाठी हेल्दी, झटपट तयार करा चण्याच्या पिठाचा पोळा, रेसिपीचा संपूर्ण Video
सर्व पहा

क्रिकेटमध्ये राडा होणे हे काय नवीन नाही. कधीकधी अर्धवट व्हिडिओ,किंवा स्लो मोशन व्हिडिओ पाहून असे निश्कर्ष लावले जातात. पण या घटनेत असं काहीच घडलं नाही आहे. त्यामुळे पाकिस्तानची इज्जत वाचली आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PSL मध्ये तुफान राडा, डेविड वॉर्नर-मोईन एकमेकांच्या अंगावर धावले, नेमकं काय घडलं? VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल