TRENDING:

Mumbai Crime News : दादर स्टेशनमध्ये बॅगेत सापडलेल्या 'त्या' मृतदेह प्रकरणात मोठं ट्विस्ट, मैत्रिणीसाठी मित्रानेच घेतला मित्राचा जीव

Last Updated:
रविवारी रात्री 12.30 वाजता दादरहून सुटलेल्या तुतारी एक्स्प्रेसमध्ये एका व्यक्तीकडे असलेल्या सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आला होता.
advertisement
1/7
दादरमध्ये सापडलेल्या 'त्या' मृतदेह प्रकरणात मोठं ट्विस्ट, मित्रानेच केली हत्या
रविवारी रात्री 12.30 वाजता दादरहून सुटलेल्या तुतारी एक्स्प्रेसमध्ये एक माणूस मोठी सुटकेस घेऊन जाताना दिसला होता. या बॅगेवर पोलिसांना संशय आला, बॅगची तपासणी केली असता या बॅगेत पोलिसांना रक्तानं माखलेला एक मृतदेह आढळू आला.
advertisement
2/7
पायधुनी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी जय प्रवीण चावडा आणि शिवजित सुरेंद्र सिंग अशा दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी मिळून रविवारी कुर्ला येथील अर्शद शेख या तरुणाची हत्या केली.
advertisement
3/7
हत्येनंतर ते मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तुतारी एक्सप्रेस ट्रेनने जात होते. मात्र पोलिसांना संशय आल्यानं त्यांचा भांडाफोड झाला.
advertisement
4/7
चावडा याला बॅगेसह दादर रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली आहे. आरोपी जनरल डब्यात चढण्यासाठी रांगेत उभे होते. बॅग तपासत असताना शिवजित पळून गेला, तर चावडा याला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली. दरम्यान त्यानंतर शिवजित याला देखील उल्हासनगरमधून ताब्यात घेण्यात आलं आहे.
advertisement
5/7
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्य आरोपी आणि मृत्यू झालेल्या अर्शद शेख यांच्यात आरोपीच्या मैत्रिणीवरून भांडण झाले होते. यानंतर आरोपीने अर्शदला पायधुनी येथील किका रोडवरील घरी पार्टीसाठी बोलावले आणि चाकूने वार केले.
advertisement
6/7
हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि नंतर तो घेऊन घराबाहेर पडला. मृतदेहाचं शरीर पूर्णपणे प्लास्टिकमध्ये गुंडाळले होते जेणेकरून बाहेर काहीही दिसत नव्हते. मात्र, रेल्वे पोलिसांनी बॅग तपासणीदरम्यान आरोपीला पकडले.
advertisement
7/7
आरोपी आणि मृत व्यक्तीमध्ये आरोपीच्या मैत्रिणीवरून भांडण झालं होतं, यानंतर आरोपीनं त्याला पायधुनी येथील किका रोडवरील घरी पार्टीसाठी बोलावलं, या वेळी आरोपीनं चाकूनं वार केला. हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी मृतदेह सुटकेसमध्ये भरून घराबाहेर पडला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Crime News : दादर स्टेशनमध्ये बॅगेत सापडलेल्या 'त्या' मृतदेह प्रकरणात मोठं ट्विस्ट, मैत्रिणीसाठी मित्रानेच घेतला मित्राचा जीव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल