सावधान! उद्या 1 वाजून 46 मिनिटांनी 'या' 5 राशींची उलटी गिनती सुरू, कोणाची उडणार झोप?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा आणि भावनेचा कारक मानला जातो. उद्या, 5 मार्च 2026 रोजी चंद्राचे महत्त्वाचे राशी परिवर्तन होणार आहे.
advertisement
1/7

ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा आणि भावनेचा कारक मानला जातो. उद्या, 5 मार्च 2026 रोजी चंद्राचे महत्त्वाचे राशी परिवर्तन होणार आहे. दुपारी 1 वाजून 46 मिनिटांनी चंद्र सिंह राशीतून बाहेर पडून बुध ग्रहाच्या मालकीच्या कन्या राशीत प्रवेश करेल.
advertisement
2/7
या संक्रमणामुळे कन्या राशीत चंद्र आणि केतूची युती होण्याची शक्यता असून, त्याचा नकारात्मक प्रभाव 5 राशींवर दिसून येईल. या राशींच्या जातकांचा उद्याचा दिवस मानसिक तणाव आणि आव्हानांनी भरलेला असू शकतो.
advertisement
3/7
मेष: चंद्राचे हे संक्रमण मेष राशीच्या सहाव्या भावात होणार आहे. यामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचे गुप्त शत्रू सक्रिय होतील आणि तुमच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न करतील. उद्या कोणालाही पैसे उधार देऊ नका, अन्यथा ते परत मिळणे कठीण होईल.
advertisement
4/7
सिंह: चंद्र तुमच्या राशीतून बाहेर पडत असला तरी, वक्री बुध आणि गुरुच्या प्रभावामुळे तुम्हाला आर्थिक चणचण भासू शकते. कौटुंबिक वादात पडणे टाळा. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी उद्याचा दिवस योग्य नाही. संतापावर नियंत्रण न ठेवल्यास जवळच्या व्यक्तींशी तुमचे संबंध बिघडू शकतात.
advertisement
5/7
कन्या: चंद्र तुमच्याच राशीत प्रवेश करत असल्याने आणि तिथे आधीच असलेल्या ग्रहांच्या युतीमुळे तुमचे मन द्विधा अवस्थेत असेल. अतिविचारामुळे मानसिक थकवा जाणवेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवहाराबाबत पारदर्शकता ठेवावी, अन्यथा वाद ओढवून घ्याल.
advertisement
6/7
वृश्चिक: वृश्चिक राशीच्या जातकांना उद्या कष्टाच्या तुलनेत कमी फळ मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या आरोग्याबाबत चिंता सतावू शकते. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होतील, त्यामुळे जोडीदाराशी संवाद साधताना संयम ठेवा. अचानक प्रवास करावा लागल्यास सामानाची काळजी घ्या.
advertisement
7/7
मीन: चंद्राचे संक्रमण तुमच्या सातव्या भावात होत आहे. जोडीदाराशी किरकोळ कारणावरून खटके उडू शकतात. व्यावसायिक क्षेत्रात नवीन गुंतवणूक करताना सावधानता बाळगा. वक्री गुरुमुळे नशिबाची साथ कमी मिळेल, त्यामुळे केवळ मेहनतीवर विश्वास ठेवा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
सावधान! उद्या 1 वाजून 46 मिनिटांनी 'या' 5 राशींची उलटी गिनती सुरू, कोणाची उडणार झोप?