TRENDING:

बोरिवली ते गोराई गाठा अवघ्या 15 मिनिटांत; रो-रोने करा सुसाट प्रवास; तिकिटांची किंमत किती?

Last Updated:
Borivali-Gorai Ferry: बोरिवली ते गोराई दरम्यान नव्याने सुरू झालेल्या जेट्टीमुळे प्रवासाचा वेळ काही मिनिटांवर आला आहे. या जलमार्गामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
advertisement
1/7
बोरिवली ते गोराई गाठा अवघ्या 15 मिनिटांत; रो-रोने करा सुसाट प्रवास; तिकिटांची किंमत किती?
मुंबई शहरादरम्यान गेल्या काही दिवसांपासून रो-रो फेरीबाबत अनेक प्रकल्प सुरु करण्यात येत आहे. या सेवेमुळे शहरातील नागरिकांचा प्रवास अधिक सोपा होणार असून वेळही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
advertisement
2/7
सध्या त्यातही बोरिवली ते गोराई रो-रो फेरी मार्गावर एका नवीन जेट्टींच काम सुरु आहे. पण ही जेट्टी पूर्ण झाल्यानंतर किती वेळ हा मार्ग पार करण्यासाठी लागेल शिवाय किती आधीपेक्षा प्रवास सोपा होणार का ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.
advertisement
3/7
सध्या एक ते दीड तास हा बोरिवली ते गोराई प्रवासाला लागतात. मात्र नव्या होणाऱ्या रो-रो जेट्टीमुळे प्रवास फक्त 15 मिनिटांत होणार आहे.
advertisement
4/7
या मार्गावरील प्रवासी भाडे हे फक्त 10 ते 15 रुपये आहे. ज्यामुळे पर्यटक आणि दररोज कामानिमित्ताने या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्याचा विशेष फायदा होणार आहे.
advertisement
5/7
प्रवासाचा कमी वेळ आणि खिशाला परवडणा मार्ग असल्याने या नव्या रो-रो फेरीला मंजुरी मिळाली आहे.
advertisement
6/7
नव्या जेट्टीमुळं प्रवासाचे अंतर जरी कमी झाले असेल तरी यात काही समस्यांमुळे वाढ झालेली आहे आणि त्यात वीकेंडदरम्यान प्रवासी संख्येत वाढ झाल्याने ही समस्या अधिक होते.
advertisement
7/7
यात सध्या सुरु असलेल्या बांधकामुळे जेट्टी अरुंदझाली आहे त्यामुळे रुग्णवाहिका पोहचवणं कठीण झाले तसेच अनेकवेळा सुरक्षारक्षक नसल्याने नियंत्रण ठेवणंही अशक्य होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
बोरिवली ते गोराई गाठा अवघ्या 15 मिनिटांत; रो-रोने करा सुसाट प्रवास; तिकिटांची किंमत किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल