TRENDING:

Instant Potato Chips : न वळवता झटपट बनतील बटाट्याचे चिप्स अन् महिनाभर टिकतीलही! पाहा युनिक पद्धत

Last Updated:
How to make potato chips without sunlight : उन्हाळ्यात वाळवणाचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवले जातात. यामध्ये पापड, कुरडया, बटाट्याचे चिप्स, साबुदाण्याचे चिप्स असे बरेच पदार्थ बनवले जातात. मात्र या सर्वांना खूप वेळ आणि मेहनत लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बटाट्याचे चिप्स बनवण्याची सोपी पद्धत सांगत आहोत.
advertisement
1/9
न वळवता झटपट बनतील बटाट्याचे चिप्स अन् महिनाभर टिकतीलही! पाहा युनिक पद्धत
बटाट्याचे चिप्स पारंपरीक पद्धतीनं बनवायचे म्हंटल तर त्याला बरेच दिवस उन्हात वाळवावंही लागतं. त्यानंतर ते वर्षभर टिकतात. मात्र या आम्ही तुम्हाला एका सोप्या पद्धतीनं काही तासांत बनणारे बटाटा चिप्सची रेसिपी सांगत आहोत. जे महिनाभर तरी आरामशीर टिकतील. चला पाहूया.
advertisement
2/9
बटाता चिप्स बनवण्यासाठी मोठे आणि टाईट बटाटे लागतात. त्याचसोबत तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ, चाट मसाला, काळी मिरी किंवा लाल तिखट, स्वच्छ कॉटन टॉवेल किंवा कापड लागेल.
advertisement
3/9
चिप्स बनवण्यासाठी सर्वात आधी बटाटे धुवून स्वच्छ करा. त्यानंतर त्याची साल काढून पुन्हा स्वच्छ धुवा. आता त्याचे मशीनच्या साहाय्याने किंवा किसणीच्या साहाय्याने पतले पतले चिप्स करा. काप खूप जाड किंवा अगदी कागदासारखे पातळ नसावे.
advertisement
4/9
हे चिप्स त्वरित थंड पाण्यात टाका. यानंतरही परत हे चिप्स 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवा, जोपर्यंत पाणी अगदी स्वच्छ राहत नाही. यामुळे बटाट्यांवरील पांढरा फेस पूर्णपणे निघतो आणि चिप्स तळताना चिप्स लाल किंवा काळे होत नाहीत.
advertisement
5/9
आता चिप्स पाण्यातून काढा, एखाद्या गाळणीवर ठेवा आणि त्याचे पाणी निथळू द्या. त्यानंतर चिप्स कॉटनच्या कापडावर पसरावा अन त्याचे पूण पाणी काढून टाकण्याचा प्रयत्न करा. कापड घेऊन हाताने चिप्स कोरडे करा.
advertisement
6/9
हवं असे तर तुम्ही हे चिप्स 5-10 मिनिटे पंख्याखाली देखील ठेवू शकता. मात्र कोणत्याही पद्धतीने चिप्स पूर्णपणे कोरडे होतील याची खात्री करा. चिप्सवर अजिबात ओलावा राहता कामा नये.
advertisement
7/9
आता गॅसवर कढई ठेवा आणि त्यामध्ये तेल टाका. तेल मोठ्या फ्लेमवर छान गरम होऊ द्या. तेलातून वाफ येऊ लागल्यावर काही चिप्स त्यात टाका. आता गॅस मध्यम करा आणि चिप्स व्यवस्थित चिप्स हलके सोनेरी आणि कुरकुरीतहोईपर्यंत टाळून घ्या.
advertisement
8/9
चिप्स तळल्यानंतर लगेच टिश्यू पेपरवर काढा आणि गरम असतानाच त्यावर थोडे मीठ, चाट मसाला आणि लाल तिखट टाकून चांगलं मिक्स करा. अशापराकारे तुमचे कमी वेळेत बनणारे चिप तयार होतात.
advertisement
9/9
चिप महिनाभर कुरकुरीत ठेवण्यासाठी चिप्स तळल्यानंतर ते खोलीच्या तपमानावर पूर्णपणे थंड होऊ द्या. तसेच थंड झाल्यावर ते एअर टाईट कंटेनरमध्ये टाकून कोरड्या जागी ठेवा. चिप्सला उष्णता किंवा ओलावा लागू देऊ नका. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Instant Potato Chips : न वळवता झटपट बनतील बटाट्याचे चिप्स अन् महिनाभर टिकतीलही! पाहा युनिक पद्धत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल