TRENDING:

IPL 2026 : वर्ल्ड कपचं गिफ्ट मिळणार? संजू सॅमसन होणार CSK चा कॅप्टन? 'चेता'ने दोनच वाक्यात विषय संपवला!

Last Updated:
Sanju Samson Captain Of CSK : मागील आयपीएल हंगामानंतर मोठ्या घडामोडी घडल्या. त्यात सर्वात मोठी घडमोड म्हणजे संजू सॅमसन याला चेन्नई सुपर किंग्जने आपल्या ताफ्यात घेतलं.
advertisement
1/7
IPL 2026 : वर्ल्ड कपचं गिफ्ट मिळणार? संजू सॅमसन होणार CSK चा कॅप्टन? 'चेता'ने दोनच वाक्यात विषय संपवला!
च्या ट्रेड विन्डोमध्ये चेन्नईने मोठा डाव खेळला अन् रविंद्र जडेजाच्या बदल्यात संजू सॅमसनची चेन्नई सुपर किंग्जमध्ये एन्ट्री झाली. टीम इंडियाचा चेता आता येलो जर्सीत खेळणार आहे.
advertisement
2/7
त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढलीये. अशातच आता सीएसकेची कॅप्टन्सी संजूला दिली जाईल, अशी चर्चा होताना दिसतीये. त्यावर संजू सॅमसनने स्पष्ट उत्तर दिलं आहे.
advertisement
3/7
एका कार्यक्रमात तुला संजूला सुचक प्रश्न विचारला गेला होता. चेन्नई सुपर किंग्जमध्ये 'हेड्स आणि टेल्स' करण्याची मला गरज नाही, कारण तिथे फक्त एकच 'हेड' आहे आणि ते म्हणजे एम एस धोनी, असं संजू सॅमसन यावेळी म्हणाला.
advertisement
4/7
संजूने कॅप्टन्सीच्या चर्चांना फुल स्टॉप दिला आहे. माझं मुख्य ध्येय टीम मॅनेजमेंट आणि माही भाईने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणं आहे, असं संजू सॅमसन म्हणाला.
advertisement
5/7
धोनीसोबत अनेकदा चर्चा झाली असली तरी, प्रत्यक्ष मैदानात त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. या संधीतून खूप काही शिकायला मिळेल, असा विश्वासही संजू सॅमसनने व्यक्त केला आहे.
advertisement
6/7
तुम्हाला आठवत असेल तर चेन्नई सुपर किंग्जने 2023 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी धोनी कॅप्टन होता. त्यानंतर ऋतुराज गायकवाडला कॅप्टन्सी सोपवण्यात आली अन् चेन्नईमध्ये पुन्हा दुष्काळ पडला.
advertisement
7/7
मागील दोन वर्षात ऋतुराज गायकवाडच्या कॅप्टन्सीखाली चेन्नईला खास कामगिरी करता आली नाही. त्याला टीमला प्लेऑफ्समध्ये देखील पोहोचवता आलं नव्हतं. त्यामुळे सीएसके कॅप्टन बदलणार का? असा सवाल विचारला जातोय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : वर्ल्ड कपचं गिफ्ट मिळणार? संजू सॅमसन होणार CSK चा कॅप्टन? 'चेता'ने दोनच वाक्यात विषय संपवला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल