इंडक्शन स्टोव्हवर स्वयंपाक करताय? होऊ शकते शॉर्ट सर्किट, असा करा बचाव
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
देशभरातील लोकं सध्या गॅसच्या तुटवड्यामुळे चितेंत आहेत. असं असताना अनेकांनी इंडक्शन स्टोव्हचा मार्ग स्वीकरालाय. पण ते वापरत असताना खुप काळजी घेणं गरजेचं असतं. चला पाहूया कोणती काळजी घ्यावी...
advertisement
1/10

देशातील एलपीजीच्या तुटवड्याची चिंता सर्वसामान्य लोकांना पडली आहे. यामुळे अनेक लोक हे इंडक्शन स्टोव्हवर जेवण तयार करण्याला प्राधान्य देताय. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने थेट फ्लेमच्या जागी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या मदतीने भांडे गरम होते. यामुळे जेवण लवकर शिजते आणि तापमान कंट्रोल करणेही सोपं होतं.
advertisement
2/10
तुम्ही इंडक्शनचा वापर करत असताना तो योग्य प्रकारे व्हावी अशी काळजी घ्यायला हवी. असं न झाल्यास, ओव्हरहिटिंग, ग्लासच्या पृष्ठभागाला नुकसान, इलेक्ट्रिकल प्रॉब्लम किंवा आग लागण्यासारख्या समस्याही होऊ शकतात. यामुळे काही सावधगिरी बाळगणे आणि योग्य प्रकारे उपयोग करणे खुप गरेजेच आहे. इंडक्शन कुकटॉप वापरत असताना या 5 गोष्टींविषयी अवश्य जाणून घ्या.
advertisement
3/10
योग्य भांड्याचा वापर करा : इंडक्शन कुकटॉपवर फेरोमॅग्नेटिक मटेरियल असणारे म्हणजेच कास्ट आयरन किंवा मॅग्नेटिक स्टेनलेस स्टीलचे भांडेच वापरावे लागतात. मॅग्नेट भांड्याच्या खाली चिटकले तरच इंडक्शनवर ते वापरले जाऊ शकते.
advertisement
4/10
भांडे योग्य प्रकारे ठेवा - कुकटॉप ऑन करण्यापूर्वी भांड्याला हीटिंग झोनच्या मधोमध ठेवा. यामुळे उष्णता पसरते आणि जेवण लवकर शिजते.
advertisement
5/10
हिटिंग झोनच्या हिशोबाने भांडे निवडा : इंडक्शनवर भांडे वापरताना नेहमी बेस हिटिंग झोनच्या साइजमध्ये बसणारेच भांडे वापरा. चुकीच्या साइजचे भांडे ठेवल्याने कुकिंगची एफिशिएन्सी कमी होऊ शकते.
advertisement
6/10
एयरफ्लोसाठी जागा ठेवा : इंडक्शन कुकटॉपच्या आजुबाजूला किंमान 10 सेटीमीटर जागा सोडा. याच्या आत लावलेले कूलिंग फॅन योग्य प्रकारे काम करते आणि ओव्हरहिटिंग होत नाही. ज्यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका टाळता येतो.
advertisement
7/10
वापरानंतर पृष्ठभाग स्वच्छ करा : कुकटॉप बंद झाल्यावर आणि रेजिड्यूअल हीट इंडिकेटर संपल्यानंतर ग्लासचा पृष्ठभाग स्वच्छ करा. यासाठी सॉफ्ट कपडा आणि खास कुकटॉप क्लीनरचा वापर करा.
advertisement
8/10
इंडक्शन कुकटॉपवर करू नका 5 चुका : चुकीच्या मटेरियल असणाऱ्या भांड्याचा वापर करू नका. अॅल्यूमिनियम, कॉपर, ग्लास किंवा सिरेमिक भांडे इंडक्शनवर काम करत नाहीत. त्यांचा बेस मॅग्नेटिक असावा लागतो.
advertisement
9/10
धातूच्या वस्तू पृष्ठभागावर ठेवू नका - चमचे, चाकू, फोर्क, झाकणं किंवा अॅल्युमिनियम फॉइलसारक्या गोष्टी कुकटॉपवर ठवू नका. अन्यथा त्या गरम होऊ शकतात. यासोबतच भांडे हे त्यावर सरकवू नका. कुकटॉपच्या ग्लासचा पृष्ठभाग भांडे सरकवून घेतल्याने स्क्रॅच पडू सकते. ते आरामात उचलून घ्या.
advertisement
10/10
व्हेंटिलेशन ब्लॉक करु नका : कुकटॉपच्या खाली किंवा मागे तयार एयर व्हेंट कधीच बंद करू नका. यामुळे मशीन ओव्हरहीट होऊ शकते. यासोबतच पृष्ठभाग तुटला असेल तर त्याचा वापर करू नका. कुकटॉपचा ग्लास क्रॅक झाला तर ते वापरणे लगेच बंद करा. यामुळे करंट लागण्याचा धोका असू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
इंडक्शन स्टोव्हवर स्वयंपाक करताय? होऊ शकते शॉर्ट सर्किट, असा करा बचाव