पाकिस्तानचा काबूलवर हवाई हल्ला — 400 जणांचा मृत्यू
पाकिस्तानच्या या नापाक कृत्यानंतर राशीद खान याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. काबूलमध्ये पाकिस्तानी हवाई हल्ल्यांमुळे झालेल्या नागरिकांच्या मृत्यूच्या ताज्या वृत्तांमुळे मला खूप दुःख झालंय. जाणूनबुजून किंवा चुकून, नागरिकांची घरे, शैक्षणिक सुविधा किंवा वैद्यकीय पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं हा युद्ध गुन्हा आहे, असं राशीद खान म्हणाला. विशेषतः रमजानच्या पवित्र महिन्यात मानवी जीवनाची केलेली अवहेलना ही वेदनादायक आणि गंभीर चिंताजनक आहे, असंही राशीद यावेळी म्हणाला.
advertisement
राशीद खानचा संताप — 'हा युद्ध गुन्हा आहे!'
पाकिस्तानच्या अशा कृतीमुळे केवळ फूट आणि द्वेष निर्माण होईल. मी संयुक्त राष्ट्र आणि इतर मानवाधिकार संस्थांना या नवीनतम अत्याचाराची सखोल चौकशी करण्याचे आणि गुन्हेगारांना जबाबदार धरण्याचं आवाहन करतो. या कठीण काळात मी माझ्या अफगाण लोकांसोबत उभा आहे. आपण बरं होऊ आणि एक राष्ट्र म्हणून आपण उठू. आपण नेहमीच असे करतो. इन्शाअल्लाह, असं राशीद खानने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पाकिस्तानचं 'गजब-लिल-हक' ऑपरेशन
दरम्यान, पाकिस्तानने रविवारी रात्रीभरही कंधार प्रांतात हवाई हल्ले करून दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा केला होता. पाकिस्तानने ही कारवाई 'गजब-लिल-हक' ऑपरेशन अंतर्गत केली. याला अफगाणिस्तानच्या तालीबानी सरकारने प्रत्युत्तर देखील दिलं आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या लष्करी तळावर हल्ला केला अन् पाकिस्तानला पुन्हा बॅकफुटवर आणलं. तर शुक्रवारी रात्री अफगाणिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला होता.
