advertisement

पतीचं निधन, पण ती जिद्दीनं उभं राहिली, घरातून बिझनेस सुरू केला, आज लाखात कमाई, Video

Last Updated:

Business Success: आज या व्यवसायाच्या माध्यमातून दर महिन्याला तब्बल एक लाख रुपयांपर्यंत कमाई होत असल्याचे सारिका यांनी सांगितलं.

+
Business

Business Success: पतीचं निधन, पण ती जिद्दीनं उभं राहिली, घरातून बिझनेस सुरू केला, आज लाखात कमाई, Video

पुणे: पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी अंगावर आली. तरीही बारामतीतील गृहिणीने ती जिद्द आणि कष्टाच्या जोरावर समर्थपणे पेलली. सारिका पवार यांनी घरातूनच छोटासा लाकडी वस्तू तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाच्या माध्यमातून त्या आज महिन्याला लाखाच्या घरात कमाई करत आहेत. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आता याच व्यवसायावर चालतोय. लोकल18 च्या माध्यमातून याच सारिका पवार यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊ.
सारिका पवार यांनी सांगितलं की, पतीच्या निधनानंतर उदरनिर्वाहासाठी कोणतेही ठोस साधन नसल्याने त्यांनी लाकडी वस्तूंचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला या व्यवसायातून फारशी कमाई होत नव्हती. मात्र हळूहळू त्यांनी व्यवसायाचे मार्केटिंग सुरू केले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडी वस्तू तयार करायला सुरुवात केली.
advertisement
तयार केलेल्या वस्तू पुण्यासह इतर ठिकाणी विक्रीसाठी पाठवू लागल्याने व्यवसाय वाढत गेला. या व्यवसायासाठी लाकूड विकत आणून त्यापासून हाताने विविध वस्तू तयार केल्या जातात. पोळपाट, बेलणे, रवी आणि इतर वस्तू त्या बनवतात. आज या व्यवसायाच्या माध्यमातून दर महिन्याला तब्बल एक लाख रुपयांपर्यंत कमाई होत असल्याचे सारिका यांनी सांगितलं.
झोपडीतून सिमेंटच्या घरापर्यंतचा प्रवास
सारिका पवार या व्यवसाय सुरू करण्यापूर्वी झोपडीत राहत होत्या. पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. उदरनिर्वाहासाठी त्यांनी लाकडी वस्तू तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाच्या जोरावर त्यांनी स्वतःची जागा घेत सिमेंटचे घर बांधले आणि गाडीही खरेदी केली. तसेच आपल्या तीन मुलांना उच्च शिक्षण दिले असून दोन मुलांची लग्ने देखील लावून दिली आहेत. आज त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो.
view comments
मराठी बातम्या/मनी/
पतीचं निधन, पण ती जिद्दीनं उभं राहिली, घरातून बिझनेस सुरू केला, आज लाखात कमाई, Video
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement