TRENDING:

Motorolaचा प्रीमियम फ्लिप फोन 20 हजार रुपयांनी झाला स्वस्त! झटपट होतोय ऑर्डर

Last Updated:
विविध ई-कॉमर्स साइटवर अनेक मोबाईल्सवर डिस्काउंट्स ऑफर सुरू असते. अनेकदा महागडा फोनही यावर खुप स्वस्त मिळतोय. सध्या मोटोरोला रेज 40 अॅमेझॉनवर अगदी स्वस्तात मिळतोय.
advertisement
1/7
Motorolaचा प्रीमियम फ्लिप फोन 20 हजार रुपयांनी झाला स्वस्त! झटपट होतोय ऑर्डर
मुंबई : तुम्हाला प्रिमियम स्मार्टफोन अगदी स्वस्तात खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. यातही तुम्हाला फोल्डेबल स्मार्टफोन हवा असेल आणि तुमचं बजेटही जास्त नसेल ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण मोटोरोलाचा स्टायलिश फ्लिप फोन मोटोरोला रेज 40 आता मोठ्या डिस्काउंटसह तुम्ही खरेदी करू शकता.
advertisement
2/7
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर या स्मार्टफोनची किंमत सध्या 39,999 रुपये करण्यात आली आहे. लॉन्चच्या वेळी या फोनची किंमत 59,999 रुपये होते. म्हणजेच या फोनवर थेट 20 हजार रुपयांचं फ्लॅट डिस्काउंट मिळतंय. या व्यतिरिक्त तुम्ही अॅमझॉनवर ICICI बँक क्रॅडिक कार्डने पेमेंट केलं तर तुम्हाला 1,042 रुपयांचं अॅडिशनल डिस्काउंटही मिळू शकतं.
advertisement
3/7
तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल आणि एकाचवेळी पैसे द्यायचे नसतील त्यांच्यासाठी नो-कॉस्ट ईएमआयचा ऑप्शनही उपलब्ध आहे. या फोनचा ईएमआय 1,406 प्रति महीन्याने सुरू होतो. तसंच तुम्हाला तुमचा जुना फोन एक्सचेंज करायचा असेल तर तुम्हाला 37,950 पर्यंत एक्सचेंज बोनसही मिळू शकते.
advertisement
4/7
फोनचे स्पेसिफिकेशन्स कसे आहेत? : फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास मोटोरोला रेजर 40 मध्ये 6.9 इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आलाय. जो 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या व्यतिरिक्त यामध्ये एक लहान एक्सटर्नल AMOLED डिस्प्लेही मिळतो. ज्यामुळे फोन न उघडताही अनेक कामं केली जाऊ शकतात.
advertisement
5/7
परफॉर्मेंससाठी यामध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 प्रोसेसर देण्यात आले आहे. जे 4nm टेक्नॉलॉजीवर बेस्ड आहे. फोनमध्ये 12GB पर्यंत RAM आणि 256GB स्टोरेज मिळतं. ज्यामुळे हे रोजची कामं आणि मल्टीटास्किंगसाठी चांगला ऑप्शन ठरतो.
advertisement
6/7
फोनच्या कॅमेराविषयी बोलायचं झाल्यास 64MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 13MP चा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आलाय. यासोबतच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.बॅटरीसाठी यामध्ये 4,200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 30W फास्ट चार्जिंग आणि 5W वायरलेस चाजिंगला सपोर्ट करते.
advertisement
7/7
तुम्हाला कमी किंमतीत फोल्डेबल फोनचा एक्सपीरियन्स घ्यायचा असेल तर मोटोरोला रेजर 40 वर सुरू असलेली ऑफर तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Motorolaचा प्रीमियम फ्लिप फोन 20 हजार रुपयांनी झाला स्वस्त! झटपट होतोय ऑर्डर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल