TRENDING:

OTT Release This Week : क्राइम-थ्रिलर ते सुपरहिरो! 16-22 मार्च OTT वर धमाका, या वेब सीरिज अन् चित्रपट होतायत रिलीज

Last Updated:
जर तुम्हाला घरबसल्या नवीन कंटेंट किंवा नवीन स्टोरी पाहायची असेल तर तुम्ही या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकता. 16 मार्च ते 22 मार्च या कालावधीत अनेक चित्रपट आणि वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहेत. 
advertisement
1/8
क्राइम-थ्रिलर ते सुपरहिरो! 16-22 मार्च OTT वर धमाका, या वेब सीरिज अन् चित्रपट होतायत रिलीज
जर तुम्हाला थिएटरमध्ये जायचे नसेल आणि घरी काहीतरी चांगलं पाहायचं असेल तर या आठवड्यात, अनेक क्राइम, थ्रिलर, सुपरहिरो आणि वॉर ड्रामा, चित्रपट आणि सीरिज OTT प्लॅटफॉर्मवर येत आहेत. 
advertisement
2/8
 या आठवड्यात 12 प्रमुख OTT चित्रपट आणि वेब सिरीज तुमचे मनोरंजन करण्यासाठी येत आहेत. पहिली 'जॅझ सिटी' ही म्युझिकल ड्रामा असलेली सीरिज आहे. 
advertisement
3/8
ही कथा 1970 च्या कोलकातामध्ये घडते. यात एका जाझ क्लबचे आणि त्यातील कलाकारांचे सुंदर आयुष्य दाखवण्यात आलं आहे. जिमी रॉय नावाचे एक पात्र अचानक बांगलादेश मुक्ती युद्धाशी थेट संबंध असलेल्या धोकादायक घटनांमध्ये अडकते.
advertisement
4/8
दिव्या दत्ताची सीरिज 'चिरैया'. ज्यामध्ये ती कमलेशची भूमिका साकारते. ती एक आदर्श सून आहे. परंतु तिला अनेक कठीण निर्णयांना तोंड द्यावे लागते. ती तिच्या कुटुंबाचे रक्षण करणे आणि तिच्या वहिनीच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवणे यात अडकलेली आहे. ही कथा महिलांच्या मौन आणि अत्याचाराविरुद्ध बोलते.
advertisement
5/8
'पीकी ब्लाइंडर्स: द इमॉर्टल मॅन' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सिलियन मर्फीचा "पीकी ब्लाइंडर्स: द इमॉर्टल मॅन" हा एक क्राइम ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात तिला तिच्या मुलाला धोकादायक कटापासून वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.
advertisement
6/8
दुसरी अॅनिमेटेड सुपरहिरो मालिका इनव्हिजिबल 4. हा सुपरहिरो अॅनिमेटेड सीरिजचा नवीन सीझन आहे. मार्क ग्रेसनला त्याच्या आयुष्यात नवीन धोके येतात. 18 मार्चला ही सीरिज अमेझोन प्राइमवर रिलीज होणार आहे. अ‍ॅक्शन आणि इमोशनचे जबरदस्त कॉम्बो तुमचं मन जिंकेल. IMDb वर याला 8. 7 रेटींग आहे.
advertisement
7/8
'सिनर्स' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. 'सिनर्स' हा चित्रपट अकादमी ऑस्कर 2026 च्या नॉमिनेशनमध्ये होता. 16 कॅटेगिरीमध्ये 16 नॉमिनेशन जिंकून त्याने जिंकली. 'मील तिकीट' हा सिनेमा19 मार्च रोजी प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.जॉर्डन, लेब्रॉन जेम्स, कोबे, कॅन्डिस आणि शाक सारखे दिग्गज कलाकार आहेत. हा सिनेमा फॅमिलीसोबत तुम्ही पाहू शकता.
advertisement
8/8
ज्युरी ड्यूटी प्रेझेंट्स: कंपनी रिट्रीट ही एक कॉमेडी डॉक्युमेंट्री आहे. 20 मार्चला प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. याला IMDb रेटिंग 8.2 रेटींग आहे. जर तुम्ही वेगळ्या प्रकारची सीरिज शोधत असाल तर ही सीरिज तुमच्यासाठी योग्य आहे. 'डेडलॉक' या सीरिजचा दुसरा सीझन देखील खूप चर्चेत आहे. ही सीरिज 20 मार्चला प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. ही सीरिज कॉमेडी, क्राइम आणि रहस्यांनी भरलेली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Release This Week : क्राइम-थ्रिलर ते सुपरहिरो! 16-22 मार्च OTT वर धमाका, या वेब सीरिज अन् चित्रपट होतायत रिलीज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल