Railway schedule update : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय! नववर्षापासून मुंबई-पुणे गाड्यांच्या वेळा बदलणार; जाणून घ्या वेळापत्रक
Last Updated:
New Year Train Schedule : 1 जानेवारी 2026 पासून मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल होणार आहेत. मुंबई-पुणे मार्गावरील वंदे भारतसह अनेक गाड्यांच्या वेळा बदलल्या असून प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळ तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
1/6

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही प्रवासाचा बेत आखत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. १ जानेवारी २०२६ पासून मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात येणार आहेत.
advertisement
2/6
महत्त्वाचे म्हणजे मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. यामध्ये प्रवाशांची पसंती असलेली हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस देखील समाविष्ट आहे.
advertisement
3/6
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की नवीन वेळापत्रकामुळे मुंबईहून सुटणाऱ्या तसेच मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांच्या वेळेत 5 ते 15 मिनिटांचा फरक पडू शकतो. काही गाड्या आधी सुटतील तर काही गाड्या उशिरा सुटणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या गाडीची अचूक वेळ तपासणे अत्यंत गरजेचे आहे.
advertisement
4/6
मुंबई-पुणे-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळेत काही मिनिटांचे बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांची वाढती संख्या, वेळेचे व्यवस्थापन आणि तांत्रिक सुधारणा यामुळे हे बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नवीन वेळेनुसार प्रवाशांना ठरलेल्या वेळेआधीच स्थानकावर पोहोचणे आवश्यक ठरणार आहे.
advertisement
5/6
फक्त वंदे भारतच नव्हे तर मुंबई–पुणे मार्गावरील इंटरसिटी एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन या लोकप्रिय गाड्यांच्या वेळेतही अंशतः बदल होण्याची शक्यता आहे. तसेच काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या प्लॅटफॉर्म क्रमांकातही बदल करण्यात आले आहेत.
advertisement
6/6
रेल्वेने प्रवाशांना सूचना दिली आहे की प्रवासाला निघण्यापूर्वी NTES म्हणजेच (National Train Enquiry System) ॲप किंवा रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून गाडीची लाईव्ह स्थिती तपासावी. जुन्या वेळापत्रकावर विश्वास ठेवल्यास गाडी चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Railway schedule update : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय! नववर्षापासून मुंबई-पुणे गाड्यांच्या वेळा बदलणार; जाणून घ्या वेळापत्रक