TRENDING:

12 Grapes Theary : 31 डिसेंबरच्या रात्री चुकूनही खाऊ नका द्राक्ष, नाहीतर...; सोशल मीडियावरील व्हायरल ट्रेंड फॉलो करण्याआधी हे पाहा

Last Updated:
31St December Eating 12 Grapes Theary : सोशल मीडियावर 12 ग्रेप्स थिअरची व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता 12 द्राक्ष खाल्ल्याने नव्या वर्षातील इच्छा पूर्ण होतात असा दावा केला जातो आहे, याचा परिणाम होतो की नाही माहिती नाही पण डॉक्टरांनी याचे दुष्परिणाम सांगितले आहेत.
advertisement
1/7
31 डिसेंबरला रात्री खाऊ नका द्राक्ष नाहीतर...; ट्रेंड फॉलो करण्याआधी हे पाहा
सोशल मीडिया उघडलं की तुम्हाला सध्या द्राक्षांचे बरेच व्हिडीओ दिसतील. जो तो सांगतोय की 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता 12 द्राक्ष खा, यामुळे इच्छा पूर्ण होतात असा दावा केला जातो आहे. फॉरेनमधील ही परंपरा सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि आता कित्येक जण त्याचं अनुकरण करण्याच्या तयारीत आहेत, अगदी भारतातील लोकही. तुम्हीसुद्धा हे करण्याचा तयारीत असाल तर थोडं थांबा. आधी याचे धोकेही पाहून घ्या. (AI Generated Image)
advertisement
2/7
31 डिसेंबरला रात्री 12 वाजता द्राक्ष खाल्ल्याने कोणता धोका आहे, हे पाहण्याआधी आपण 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता द्राक्षं खाण्याचा सल्ला का दिला जातो आहे ते पाहुयात. तुम्ही पाहाल तर 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता टेबलखाली बसून 12 द्राक्ष खावीत असं सांगितलं जातं आहे. एका मिनिटाला एक द्राक्ष खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (AI Generated Image)
advertisement
3/7
12 द्राक्ष म्हणजे वर्षातील 12 महिन्यांचं प्रतीक. प्रत्येक एक द्राक्ष म्हणजे एका महिन्यातील इच्छा अशी 12 द्राक्ष म्हणजे 12 महिन्यातील 12 इच्छा. प्रत्येकी एक द्राक्ष खात ती इच्छा मनात ठेवल्याने ती पूर्ण होते, असा दावा या व्हिडीओंमध्ये केला जातो आहे. (AI Generated Image)
advertisement
4/7
अनेकांना खरंच असं होतं का? असा प्रश्न पडला आहे. या अशा व्हिडीओवर कमेंटही येत आहेत. काहींनी याआधी ही थिअरली आपल्याबाबतीत खरं ठरल्याचं सांगितलं आहे. काहींनी नाही. तर ज्योतिष तज्ज्ञांच्या मते एखाद्या गोष्टीवरील एकाग्रता आणि विश्वास या तत्वावर हे कार्य करतं.  जेव्हा तुमचं मन शांत आणि उपस्थित असतं, तेव्हा तुमची ऊर्जा तुम्ही ज्याला आकर्षित करू इच्छिता त्याच्याशी जुळते. ही जादू नाही तर  सजगता, पुनरावृत्ती आणि इमोशनल अलाइनमेंट आहे.
advertisement
5/7
आता 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता 12 द्राक्ष खाल्ल्याने नवीन वर्षातील 12 महिन्याच्या 12 इच्छा पूर्ण होतील की नाही हे माहिती नाही. पण रात्री द्राक्ष खाण्याचा धोका मात्र आहे. डॉक्टरांनी रात्री द्राक्ष न खाण्याचा सल्ला दिला आहे. (AI Generated Image)
advertisement
6/7
डॉक्टरांनी सांगितलं की द्राक्ष कधीही सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्याआधी खाऊ नये. कारण द्राक्षात अॅसिड असतं, ज्यामुळे अॅसिडीटी, पोट फुगणं, गॅस अशा समस्या उद्भवतात.
advertisement
7/7
त्यामुळे रिकाम्या पोटी किंवा रात्री जेवणानंतर खाऊ नये. द्राक्ष नेहमी दुपारी, सकाळी नाश्त्यानंतर खा, असा सल्ला यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर व्हिडीओ पोस्ट करत दिला आहे. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
12 Grapes Theary : 31 डिसेंबरच्या रात्री चुकूनही खाऊ नका द्राक्ष, नाहीतर...; सोशल मीडियावरील व्हायरल ट्रेंड फॉलो करण्याआधी हे पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल