Weather Update : डिसेंबरच्या शेवटीही थंडीचा जोर वाढला! मुंबई-पुण्यासह राज्यात गारठ्याची लाट; वाचा आजचा हवामान अंदाज
- Reported by:Namita Suryavanshi
- local18
- Published by:Tanvi
Last Updated:
Winter Weather Maharashtra : राज्यभरात थंडीचा जोर वाढला असून निफाडमध्ये किमान 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील काही दिवस गारठा कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी.
advertisement
1/5

डिसेंबर महिन्याच्या शेवटाकडे जात असतानाच तापमानाचा पारा अनेक भागांत खाली घसरला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये थंडीची तीव्रता हळूहळू वाढू लागली असून सकाळच्या वेळेत गारवा अधिक जाणवत आहे. 23 डिसेंबर रोजीही राज्यभरात हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
advertisement
2/5
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मागील काही दिवसांच्या तुलनेत थंडीत वाढ जाणवत आहे. सकाळच्या वेळेत धुके आणि गार हवा यामुळे वातावरण अधिक थंड वाटत आहे. 23 डिसेंबर रोजी मुंबईत किमान तापमान सुमारे 14 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरातही अशीच परिस्थिती राहणार असून दिवसभर हवामान कोरडे, मात्र सकाळ-संध्याकाळी गारवा जाणवेल. कोकण पट्ट्यात थंडी फार कडक नसली तरी गार वारे आणि धुक्यामुळे थंडीचा अनुभव येत आहे
advertisement
3/5
पुणे शहरात तसेच आसपासच्या ग्रामीण भागात थंडीचा प्रभाव अधिक स्पष्टपणे दिसत आहे. रात्री आणि पहाटे गारठा वाढलेला असून तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास घसरले आहे. 23 डिसेंबर रोजी पुण्यात कमाल तापमान सुमारे 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. काही भागांत सकाळी हलके धुके दिसू शकते. ग्रामीण भागात थंडीची तीव्रता शहराच्या तुलनेत अधिक जाणवत आहे.
advertisement
4/5
मराठवाड्यात थंडीचा जोर कायम असून अनेक जिल्ह्यांत किमान तापमान 9 ते 13 अंश सेल्सिअसदरम्यान आहे. छत्रपती संभाजीनगरसह इतर भागांत सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश दिसण्याची शक्यता आहे. विदर्भातही गारठा वाढलेला असून नागपूरसह अनेक ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. सकाळी तीव्र थंडी तर दुपारी उन्हाचा चटका, अशी मिश्र स्थिती विदर्भात पाहायला मिळत आहे.
advertisement
5/5
राज्यभरात सध्या तापमानात चढ-उतार सुरू असून काही भागांत पारा लक्षणीयरीत्या घसरला आहे. निफाड येथे किमान 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने थंडीचा कडाका अधिक तीव्र झाल्याचे दिसून येते. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा प्रभाव कायम राहणार असून पुढील काही दिवसांत गारठा टिकून राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे वापरणे, तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Update : डिसेंबरच्या शेवटीही थंडीचा जोर वाढला! मुंबई-पुण्यासह राज्यात गारठ्याची लाट; वाचा आजचा हवामान अंदाज