TRENDING:

श्रावणात करा महादेवाचं कौटुंबिक दर्शन, मुंबईतील ही 5 मंदिरे आहेत प्रसिद्ध, photos

Last Updated:
मुंबईत अनेक पुरातन वास्तू, मंदिरे आणि शिल्पाकृती आहेत. मुंबईला देखील मोठा भक्तीमय वारसा लाभला आहे. यामध्ये मुंबईत ऐतिहासिक शिव मंदिरेही आहेत. याठिकाणी तुम्ही श्रावण सोमवारी जाऊन दर्शन घेऊ शकतात. तर मुंबईतील हे प्रसिद्ध महादेवाची मंदिरे कोणती आहेत, हे जाणून घेऊयात. (प्रियंका जगताप/मुंबई, प्रतिनिधी)
advertisement
1/5
श्रावणात करा महादेवाचं कौटुंबिक दर्शन, मुंबईतील ही 5 मंदिरे आहेत प्रसिद्ध,photos
श्री पिंपळेश्वर शिव मंदिर - पिंपळेश्वर शिवमंदिर हे पंतनगर, नवी मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित एक हिंदू मंदिर आहे. सध्या हे पिंपळेश्वर महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर 100 वर्ष जुने आहे. श्रावणी सोमवारी अनेक शिवभक्त येथे आवर्जून येतात.
advertisement
2/5
बाबुलनाथ मंदिर - मुंबईतील सर्वात प्राचीन मंदिर म्हणजे बाबुलनाथ मंदिर. हे मंदिर गिरगाव चौपाटीपासून जवळ आहे. हे मालाबार टेकडीवर स्थित एक ऐतिहासिक मंदिर आहे. येथे महाशिवरात्रीला खूप गर्दी पाहायला मिळते. तसेच श्रावणी सोमवारीही मंदिरात प्रचंड भाविकांची गर्दी पाहायला मिळते. या मंदिराचे नाव बाबुलनाथ असण्यामागे अनेक कथा आहेत.
advertisement
3/5
वाळकेश्वर मंदिर - वाळुकेश्वर मंदिराचा अनेक शतकांपूर्वीचा समृद्ध इतिहास आहे. वरळीतील वाळुकेश्वर मंदिर हे एक शांत आणि आध्यात्मिक मरुभूमी म्हणून उभे आहे. हे मलबार हिल या भागात येते. वाळकेश्वर मंदिर बाणगंगा मंदिर या नावाने देखील ओळखले जाते. मंदिराच्या वास्तूमध्ये पारंपारिक हिंदू शैली आणि आधुनिक प्रभावांचे मिश्रण आहे. प्रवेशद्वाराजवळ आल्यावर भव्य नंदीची मूर्ती असून, मुख्य मंदिरात पूजनीय महादेवाची पिंड आहे.
advertisement
4/5
अंबरनाथ मंदिर - अंबरनाथ मंदिर हे मुंबईतील प्राचीन शिव मंदिर आहे. हे मंदिर शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. मंदिरातील महादेवाला अंबरेश्वर म्हणून ओळखले जाते. श्रावणात या मंदिरात शंकराच्या भक्तीत तल्लीन झालेली भाविक पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या 218 कला-समृद्ध स्मारकांपैकी हे शिव मंदिर भारतातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे.
advertisement
5/5
चक्रेश्वर महादेव मंदिर - चक्रेश्वर महादेव मंदिर हे मुंबईतील शंकराचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराला पौराणिक वारसा आहे. हे मंदिर पर्यटकांचे आकर्षण आहे. चक्रेश्वर महादेव मंदिर हे पवित्र स्थान म्हणून प्रख्यात आहे, येथे श्री स्वामी समर्थांनी जवळच असलेल्या राममंदिराची प्रतिष्ठा केली आणि याच ठिकाणी सजीव समाधी घेतलेल्या शिष्याला आशीर्वाद दिला, असे सांगितले जाते. श्रावणात येथील मंदिर दिव्यांनी उजळून निघते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
श्रावणात करा महादेवाचं कौटुंबिक दर्शन, मुंबईतील ही 5 मंदिरे आहेत प्रसिद्ध, photos
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल