TRENDING:

ना गर्दी, ना धक्काबुक्की! फक्त 6 जण एका डब्यात बसणार, मुंबईत आता धावणार POD Taxi, नेमकी आहे तरी कशी?

Last Updated:
मुंबईमध्ये देशातील पहिली पॉड टॅक्सी सुरू झाली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पॉड टॅक्सीचे उद्धाटन करण्यात आले. याचा फायदा नोकरदारांना मोठ्या प्रमाणावर होणार असून नुकतीच पहिल्या टप्प्यातील मार्गावर ही पॉड टॅक्सी सुरू झालेली आहे.
advertisement
1/6
ना गर्दी, ना धक्काबुक्की! फक्त 6 जण एका डब्यात बसणार, मुंबईत आता धावणार POD Taxi, नेमकी आहे तरी कशी?
कुर्ला ते वांद्रा स्थानकादरम्यान धावणारी पॉड टॅक्सी ही सध्याच्या वाढत्या वाहतूक कोंडीवर मोठा उपाय ठरणार आहे. ही पॉड टॅक्सी देशातली पहिली असणार आहे. याचं उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
advertisement
2/6
यामुळे कुर्ला ते वांद्रा स्थानकादरम्यान होणार्‍या वाहतूक कोंडीपासून नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबई आणि उपनगरांतील प्रवास अधिक सोपा होणार आहे. एमएमआरडीएकडून या प्रकल्पाची उभारणी केली जात असून ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर हे तिनही शहरं मुंबईला जोडली जाणार आहेत.
advertisement
3/6
मुंबई आणि उपनगरांमध्ये वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. त्यामुळे पॉड टॅक्सी सुरू झाल्यानंतर या प्रमुख शहरांमधील प्रवास अधिक सहज आणि वेळेवर करता येणं शक्य होणार आहे. पहिल्यांदाच पॉड टॅक्सी सुरू झाली असून पहिल्या टप्प्यामध्ये 3.36 किमीमध्ये 8 स्टेशन्सवर ही टॅक्सी चालवली जाणार आहे.
advertisement
4/6
चालकरहित पॉड टॅक्सी वातानुकुलित असणार आहे. हिच्यामध्ये एकावेळी 6 पॅसेंजर बसू शकतील अशी आसन व्यवस्था आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या मॉडेल अंतर्गत या प्रकल्पाची उभारणी महाराष्ट्र सरकारने केली आहे. राज्य सरकारने सुरू केलेली ही पॉड टॅक्सी शून्य कार्बन उत्सर्जन करणारी असेल.
advertisement
5/6
दरम्यान, पॉड टॅक्सीचा फायदा कुर्ला ते वांद्रे दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. पॉड टॅक्सी ही पूर्णपणे ऑटोमेटेड इलेक्ट्रिक व्हेहईकल आहे. एका टॅक्सीत एका वेळी साधारण 6 प्रवासी बसू शकतात आणि उभे राहून 10 ते 12 प्रवासी प्रवास करु शकतात.
advertisement
6/6
खरंतर, मेट्रो आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी पॉड टॅक्सीचा उत्तम पर्याय ठरणार आहे. यामुळे मुंबई आणि उपनगरांतील दैनंदिन वाहतूक कोंडीमध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
ना गर्दी, ना धक्काबुक्की! फक्त 6 जण एका डब्यात बसणार, मुंबईत आता धावणार POD Taxi, नेमकी आहे तरी कशी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल