आजचं हवामान: 6 डिसेंबरला वारं फिरलं, कोकणात हवापालट, मुंबई-ठाण्याला पुन्हा अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: मुंबईसह कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 6 डिसेंबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/5

डिसेंबरचा पहिला आठवडा संपत आला आहे आणि त्यासोबत राज्यभर थंडीची जाणीवही वाढायला लागली आहे. गेल्या काही दिवसांत कोकण किनारपट्टीत दिवसा उष्णता जाणवत असली तरी सकाळ-संध्याकाळ तापमान घसरत आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्येही गारवा वाढलेला जाणवत आहे. हवा कोरडी असल्यामुळे रात्री थंडीचा कडाका आहे. आज, 6 डिसेंबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
मुंबईत आज किमान तापमान 19–20°C पर्यंत खाली येणार आहे, त्यामुळे सकाळी आणि रात्री गारवा स्पष्टपणे जाणवेल. दिवसा तापमान 29–31°C च्या आसपास राहणार आहे. समुद्राकडचा वारा हलका पण गार असेल, त्यामुळे हवेत थोडीशी थंडी टिकून राहील. एकूण हवामान कोरडे आणि स्वच्छ राहील.
advertisement
3/5
ठाणे, नवी मुंबई या भागात मुंबईपेक्षा थोडी अधिक थंडी जाणवत आहे. किमान तापमान 18–19°C च्या दरम्यान तर दिवसा 30–32°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सकाळी गार वारा असल्याने थंडीची भावना जास्त जाणवेल. हवामान पूर्णपणे कोरडे आणि स्थिर राहील.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात आजही चांगलीच थंडी जाणवेल. किमान तापमान 16–18°C पर्यंत खाली जाण्याची शक्यता असून सकाळी हलका धुरकट गारवा राहू शकतो. दिवसा तापमान 28–30°C पर्यंत जाईल, पण दुपारनंतर पुन्हा हवा थंड होते. वातावरण स्वच्छ, पावसाची शक्यता नाही.
advertisement
5/5
कोकणात थंडीचा प्रभाव वाढत चालला आहे. रायगडच्या काही भागात तापमान 16–18°C, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये 17–19°C च्या दरम्यान राहील. रात्रीची थंडी अधिक तीव्र जाणवेल. दिवसा तापमान 30–32°C असल्याने दुपार उबदार वाटेल, पण संध्याकाळी पुन्हा गारवा वाढतो. हवा स्वच्छ, कोरडी आणि पूर्णपणे स्थिर.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
आजचं हवामान: 6 डिसेंबरला वारं फिरलं, कोकणात हवापालट, मुंबई-ठाण्याला पुन्हा अलर्ट