Weather Alert: महाराष्ट्रात 48 तास धोक्याचे, मार्चमध्येच सूर्याचा प्रकोप, 14 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात सूर्य आग ओकत असल्याची स्थिती असून 14 जिल्ह्यांना ‘हिट वेव्ह’चा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
1/7

आजचं हवामान</a> अपडेट जाणून घेऊ." width="1600" height="900" /> महाराष्ट्रात मार्च महिन्यात सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे. उष्णतेचा पारा चाळीशी पार गेला असून काही भागात उष्णतेची लाट आली आहे. हवामान विभागाने 10 मार्च रोजी राज्यातील 14 जिल्ह्यांना ‘हिट वेव्ह’चा अलर्ट दिला आहे. त्यामुळे बहुतांश भागात उष्ण आणि कोरडे हवामान कायम राहील. कोकण ते विदर्भ विभागानुसार आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
गेल्या काही दिवसांत उत्तर कोकणला हवामान विभागाचा यलो अलर्ट कायम आहे. या भागात उष्ण आणि दमट हवामान स्थिती असून नागरिक हैराण झाले आहेत. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड भागात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून रत्नागिरीला उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट असेल. काही ठिकाणी कमाल तापमान 38 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
मध्य महाराष्ट्रात देखील तापमानात मोठी वाढ झाली आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर परिसरात ऊन चांगलंच वाढलंय. कमाल तापमान 35-39 अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान 18-22 अंशांवरच असेल. उष्ण आणि कोरडे हवामान असल्याने उकाडा जाणवेल. पावसाची शक्यता नाही.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत सोमवारी उष्णतेची लाट होती. आज हवामानात काहीसे बदल जाणवत आहेत. 10 मर्च रोजी जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट असून नाशिकसह उर्वरित जिल्ह्यांत हवामान कोरडे राहील. कमाल तापमान 36-40 अंशांपर्यंत चढेल.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांना आज पुन्हा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 48 तास या भागात उष्ण आणि दमट हवामान राहील. कमाल तापमान 38-41 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तीव्र उष्णतेची लाट राहणार असून पावसाची कोणतीही शक्यता नाही.
advertisement
6/7
विदर्भात देखील उष्णतेची लाट कायम आहे. आज अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांत ‘हिट वेव्ह’चा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांत देखील उष्णता चाळीशीच्या घरात राहील. कमाल तापमान 38-41 अंशांच्या दरम्यान असेल.
advertisement
7/7
एकंदरीत, राज्यात उष्णतेच्या लाटेचे सावट आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तापमान 39-41 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते. कोकणात दमटपणा जास्त जाणवेल. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. थेट उन्हात जाणे टाळा आणि पाणी जास्त प्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: महाराष्ट्रात 48 तास धोक्याचे, मार्चमध्येच सूर्याचा प्रकोप, 14 जिल्ह्यांना अलर्ट