'...म्हणून मला बाहेरचा रस्ता दाखवला', बिग बॉसबद्दल नेहा पेंडसेचा शॉकिंग खुलासा, सांगितला TRP साठीचा मेकर्सचा गेम प्लॅन
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Neha Pendse Bigg Boss: नेहा पेंडसे बिग बॉस १२ मध्ये दिसली होती. नुकतंच तिने या शोच्या पडद्यामागचं असं काही सत्य उघड केलंय, जे ऐकून बिग बॉसच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
advertisement
1/10

मराठी सिनेसृष्टीत अनेक बोल्ड आणि सुंदर अभिनेत्री आहे. पण आपल्या शांत स्वभावाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी नेहा पेंडसे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
advertisement
2/10
नुकतंच तिचा 'तिघी' हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमामध्ये तिच्यासोबत सोनाली कुलकर्णी आणि भारती आचरेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
advertisement
3/10
सध्या नेहा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच नुकतंच आरपार दिलेल्या एका मुलाखतीत वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केलं आहे. याचवेळी तिने बिगबॉस या शोबद्दल मोठा खुलासा केला आहे.
advertisement
4/10
नेहाने या शोच्या पडद्यामागचं असं काही सत्य उघड केलंय, जे ऐकून बिग बॉसच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नेहा पेंडसे बिग बॉस १२ मध्ये दिसली होती. मात्र अवघ्या ४ आठवड्यात तिला घराबाहेर पडावं लागलं.
advertisement
5/10
नेहाची प्रसिद्धी पाहता, ती या शोच्या फानलिस्टपैकी एक असणार अशी खात्री तिच्या चाहत्यांना होती. पण महिन्याभरात ती एव्हिक्ट झाल्याने अनेकांची निराशा झाली होती. 'बिगबॉस हा शो स्क्रिप्टेड असतो का?' हा शो वर्षानुवर्षे विचारला जात आहे. याच प्रश्नाचं उत्तर नेहाने दिलं आहे.
advertisement
6/10
नेहा म्हणाली, "हा शो स्क्रिप्टेड नसतो, पण ते तुम्हाला अशा परिस्थितीत नेऊन ठेवतात जिथे तुम्ही एकमेकांशी भांडावं. मुळातच तुमचं कास्टिंग तुमच्या स्वभावाच्या आधारावर केलेलं असतं. त्यांना माहिती असतं की कोणत्या दोन व्यक्ती एकत्र आल्यावर ठिणगी पडणार. ते तुम्हाला स्क्रिप्ट देत नाहीत, पण भांडण्यासाठी प्रवृत्त नक्कीच करतात."
advertisement
7/10
नेहाने सांगितलं की तिला बिग बॉसमध्ये जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. या शोमध्ये न जाण्यासाठी तिने निर्मात्यांकडे मुद्दाम मोठ्या रकमेची मागणी केली होती. यावरून तब्बल चार महिने त्यांच्यात चर्चा सुरू होती. पण तिचा डाव तिच्यावरच उलटला आणि निर्मात्यांनी नेहाने मागितलेली रक्कम देण्याचे आश्वासन दिले.
advertisement
8/10
इतकंच नाही, तर नेहाने ती घराबाहेर पडण्याचं कारणही सांगितलं. तिने सांगितल्यानुसार तिने विनाकारण भांडण करण्यास नकार दिल्याने चौथ्या आठवड्यात तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
advertisement
9/10
तिने मेकर्सना आधीच बजावलं होतं की, "जिथे गरज असेल तिथेच मी बोलेन. उगाच मनोरंजनासाठी किंवा टीआरपी वाढवण्यासाठी मी कोणाच्या अंगावर धावून जाणार नाही."
advertisement
10/10
नेहाच्या मते, हा शो पूर्णपणे टीआरपीवर चालतो आणि जो शांत असतो किंवा चुकीच्या गोष्टींना उघडपणे विरोध करण्याऐवजी शांत राहतो, त्याला प्रेक्षकांचा आणि मेकर्सचा पाठिंबा मिळत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'...म्हणून मला बाहेरचा रस्ता दाखवला', बिग बॉसबद्दल नेहा पेंडसेचा शॉकिंग खुलासा, सांगितला TRP साठीचा मेकर्सचा गेम प्लॅन