TRENDING:

Traditional Recipe : मटणाची चव कैक पट वाढेल, फक्त भाजी करण्यापूर्वी करा 'हे' छोटंसं काम! जबरदस्त ट्रिक

Last Updated:
Bihari Style Mutton Recipe : मटण चिकन खाणाऱ्यांची आपल्याकडे कमतरता नाही. खूप लोक ते खातात आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या भाज्या ट्राय करायला आवडतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मटणाच्या भाजीची चव वाढवण्यासाठी एक जबरदस्त ट्रिक सांगत आहोत.
advertisement
1/9
मटणाची चव कैक पट वाढेल, फक्त भाजी करण्यापूर्वी करा 'हे' छोटं काम! जबरदस्त ट्रिक
आज आम्ही तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची मटण रेसिपी सांगत आहोत. जमुई येथील रहिवासी मुन्ना कुमार यांनी ही बिहारी पद्धतीच्या मटण भाजीची रेसिपी दिली आहे. त्यांच्यानुसार, मटण चांगले बनवायचे असेल तर प्रथम चांगल्या दर्जाचं, ताज मटण घेणं आवश्यक आहे.
advertisement
2/9
खास मटणाची भाजी बनवण्यासाठी तुम्हाला 1 किलो मटण, 3-4 टेबलस्पून मोहरीचे तेल, 3 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे, चिरलेले 2 टोमॅटो, 1 टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून धणेपूड, 1 टीस्पून जिरे, 1 तमालपत्र, 2-3 लवंगा, 2 लहान वेलची, 1 दालचिनीचा छोटा तुकडा, 1/2 टीस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ, कोथिंबीर लागेल.
advertisement
3/9
सर्वात आधी महत्त्वाचं असतं मटण व्यवस्थित मॅरीनेट करणं. मटण व्यवस्थित धुवा आणि मीठ, हळद, आलं-लसूण पेस्ट आणि थोडंसं मोहरीचं तेल घालून सुमारे 30 मिनिटे मॅरीनेट करा. यामुळं मटणाची चव वाढते. मुन्ना कुमार सांगतात की, यामुळे मटण मऊ होते आणि ते मसाल्यांचा स्वाद शोषू देते.
advertisement
4/9
मटण मॅरीनेट झाल्यानंतर पॅन किंवा प्रेशर कुकरमध्ये मोहरीचं तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, तमालपत्र, लवंगा, वेलची आणि दालचिनी घाला आणि काही सेकंद परतून घ्या, जेणेकरून मसाल्यांचा सुगंध येईल. नंतर बारीक चिरलेले कांदे घाला आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत परतून घ्या.
advertisement
5/9
कांदे सोनेरी तपकिरी झाल्यानंतर आलं-लसूण पेस्ट आणि चिरलेला टोमॅटो घालून काही मिनिटे शिजवा. नंतर यात हळद, लाल तिखट आणि धणे पावडर घाला आणि मसाले चांगले परतून घ्या. आता तेल सुटेपर्यंत हे शिजवा.
advertisement
6/9
मसाल्यांना तेल सुटल्यानंतर मॅरीनेट केलेले मटण पॅनमध्ये घाला आणि 8 ते 10 मिनिटे मोठ्या फ्लेमवर परतून घ्या. यामुळे मसाले मटणात पूर्णपणे मिसळले जातील आणि त्याची चव वाढेल.
advertisement
7/9
यानंतर आवश्यकतेनुसार गरम पाणी घाला, कुकरचे झाकण बंद करा आणि तीन ते चार शिट्ट्या करून शिजवा. जर पॅनमध्ये शिजवत असाल तर झाकण ठेवा आणि मंद आचेवर शिजवा, जेणेकरून मटण हळूहळू शिजेल. मटण पूर्णपणे शिजल्यावर त्यात थोडा गरम मसाला आणि चिरलेली कोथिंबीर घाला.
advertisement
8/9
मुन्ना कुमार यांनी सांगितलं की, बिहारी शैलीतील मटणाचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याचा घट्ट मसाला आणि अस्सल चव. जर अशा प्रकारे तयार केलेले मटण गरम भात, चपाती किंवा लिट्टीसोबत सर्व्ह केले तर त्याची चव आणखी वाढते.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Traditional Recipe : मटणाची चव कैक पट वाढेल, फक्त भाजी करण्यापूर्वी करा 'हे' छोटंसं काम! जबरदस्त ट्रिक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल