Vastu Tips: तुमचे सहकारी-मॅनेजरच बनलेत प्रमोशनचे विलन; कामाच्या ठिकाणी या वस्तू ठेवणे शुभफळदायी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips : ऑफिसमध्ये अनेकजण आपल्या डेस्कवर किंवा केबिनमध्ये मोरपंख ठेवतात. वातावरण चांगलं राहण्यासोबतच त्याचे वास्तू आणि मानसिक फायदे दडलेले आहेत. खासकरून मार्च-एप्रिलमध्ये कामाचा ताण वाढलेला असताना मोरपंख ऑफिसमधील वातावरण शांत ठेवण्यास मदत करते. ऑफिस डेस्कवर मोरपंख ठेवण्याचे फायदे जाणून घेऊ.
advertisement
1/4

वास्तू शास्त्रानुसार मोरपंख स्पष्टता आणि सतर्कतेचं प्रतीक मानले जाते. ऑफिसच्या धावपळीत मोरपंख मनाला कामात फोक्सड् आणि शांत ठेवण्यास मदत करते. जेव्हा मन स्थिर असतं, तेव्हा कामात लक्ष लागून प्रगती होते.
advertisement
2/4
सहकाऱ्यांसोबतचे संबंध सुधारतात - ऑफिसमध्ये मोरपंख ठेवल्याने अहंकार किंवा ईर्ष्येमुळे होणारे वाद कमी होतात. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती वाढते. हा एक मानसिक आधारसुद्धा आहे, याने लोकांमधील संवाद सोपा आणि अधिक चांगला होतो.
advertisement
3/4
अंतर्गत स्पर्धा आणि नकारात्मकता कमी - अनेकदा ऑफिसमध्ये एकमेकांबद्दल मत्सर किंवा छुपी स्पर्धा असते. मोरपंख अशा नकारात्मक ऊर्जेपासून आपला बचाव करतो असं मानलं जातं. जर मोरपंख शेअर्ड स्पेसमध्ये (जिथे सर्वजण बसतात) ठेवला, तर टीममध्ये स्थिरता येते आणि कामाच्या ठिकाणी अनावश्यक तणाव निर्माण होत नाही.
advertisement
4/4
करिअरमध्ये वाढ - भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटात मोरपंख असल्याने त्याला प्रगती आणि संधीचं प्रतीक मानलं जातं. ऑफिसमध्ये मोरपंख ठेवल्याने करिअरमध्ये हळूहळू पण ठाम प्रगती होते. यामुळे नवीन ओळखी मिळतात आणि पगारात वाढ किंवा पदोन्नतीचे योगही जुळून येतात असं वास्तू शास्त्र सांगतं. ऑफिसमध्ये मोरपंख असणं हे एक संकेत आहे की तिथलं वातावरण शांत आणि प्रगतीशील असावं. तो केवळ सजावटीचा भाग नसून सर्वांमधील संबंध मजबूत करणारा आणि काम करण्यासाठी एक सकारात्मक ऊर्जा देणारा घटक ठरतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Vastu Tips: तुमचे सहकारी-मॅनेजरच बनलेत प्रमोशनचे विलन; कामाच्या ठिकाणी या वस्तू ठेवणे शुभफळदायी