Weather Alert: होळीला वारं फिरलं, महाराष्ट्रावर संकट, 2 मार्चला कोकण ते विदर्भ अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात 2 मार्चपासून मोठ्या बदलांची शक्यता आहे. कोकण ते विदर्भ अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/7

महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. आज 2 मार्चला होळीच्या दिवशी पुन्हा हवापालट होणार आहे. राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका आजपासून वाढणार आहे. बहुतांश भागात कोरडे, उष्ण आणि निरभ्र हवामान राहील. पावसाची कोणतीही शक्यता नाही. मात्र पुढील 2-3 दिवसांत तापमानाचा पारा 2-4 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. सोमवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
मुंबईसह कोकणात उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर परिसरात हवामान उष्ण आणि दमट राहील. उच्च आद्रतेमुळे तीव्र उकाडा जाणवेल. मुंबईत कमाल तापमान 29 ते 32 अंशांपर्यंत राहील. तर किमान 23-25 अंशांवर राहण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत उन्हाचा तडाका जास्त जाणवेल.
advertisement
3/7
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांत कोरडे व उष्ण हवामान राहील. आज कमाल तापमानात वाढ होईल. पण मार्चमध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असल्याने दिवसाचे तापमान सामान्य किंवा थोडे कमी राहण्याची शक्यता आहे. पुण्यात सकाळी थंडावा जाणवत असून दुपारी उन्हाचे चटके जाणवत आहेत.
advertisement
4/7
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या आठही जिल्ह्यांत पारा चढला आहे. उष्ण आणि कोरडे हवामान जाणवत आहे. कमाल तापमान 34-37°C च्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त जाणवू शकते. उन्हाचा तडाखा अधिक असल्याने नागरिकांना काळजी घ्यावी लागेल.
advertisement
5/7
विदर्भात उन्हाची तीव्रता वाढली आहे. नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा आदी जिल्ह्यांत उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल तापमान वाढत असून, दुपारच्या वेळेत तीव्र उष्णता जाणवेल. काही ठिकाणी पारा 35 अंशांच्या पार जाण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
महाराष्ट्रात होळीपासून हवामानात मोठे बदल होतात. थंडीची तीव्रता कमी होऊन उन्हाचे चटके वाढण्यास सुरुवात होतात. परंतु, यंदा होळीपूर्वीच तापमानात मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारीतच सामन्य तापमानापेक्षा 2-4 अंशांपर्यंत पारा चढला होता.
advertisement
7/7
दरम्यान, मार्चच्या पहिल्या आठवड्यात हवामानात बदल जाणवत आहेत. 2 मार्चला राज्यात पावसाची आणि ढगाळ हवामानाची शक्यता नाही. किमान तापमान सामान्यापेक्षा जास्त राहील. उन्हाळ्याच्या झळा जाणवत असून नागरिकांनी पाणी, सावली आणि हायड्रेशनची योग्य ती काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: होळीला वारं फिरलं, महाराष्ट्रावर संकट, 2 मार्चला कोकण ते विदर्भ अलर्ट