TRENDING:

Astrology: जळून जाणार साडेसाती होळीच्या आगीत! शिमग्यावर शुक्राचे राशीपरिवर्तन 5 राशींना भाग्याचे

Last Updated:
Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र हा ऐश्वर्य आणि सुखाचा कारक ग्रह मानला जातो. आज होळी पौर्णिमेदिवशी 2 मार्च 2026 रोजी शुक्र मीन राशीत प्रवेश करत आहे. मीन ही शुक्राची उच्च राशी असल्याने या काळात त्याचे शुभ परिणाम अधिक प्रभावीपणे पाहायला मिळतील. काही राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रेम, आनंद आणि सर्जनशीलतेसाठी अत्यंत सोयीचा ठरेल. तसेच वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांसाठी आर्थिक सुधारणा आणि वैयक्तिक गोष्टींमध्ये लाभ होईल.
advertisement
1/5
जळून जाणार साडेसाती होळीच्या आगीत! शिमग्यावर शुक्राचे राशीपरिवर्तन 5 राशींना लकी
मीन - शुक्र तुमच्याच राशीत प्रवेश करत आहे, त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी एकदम जोरात असेल. बिझनेसमध्ये चांगला नफा कमवता येईल आणि कामाचा विस्तार करण्याच्या योजना यशस्वी होतील. जे विवाहित आहेत, त्यांच्यातील रिलेशन अजून चांगले होईल आणि तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर एकत्र चर्चा कराल. तब्येतीसाठी चांगला आहार आणि व्यायामावर भर द्या. लव्ह लाईफमध्ये असलेल्यांसाठी हा काळ खूपच रोमँटिक असेल, तुम्ही तुमच्या रिलेशनला पुढच्या टप्प्यावर नेण्याचा विचार करू शकता.लकी नंबर: 3, लकी कलर: पिवळा
advertisement
2/5
कर्क - या काळात तुमची कल्पनाशक्ती वाढेल आणि तुम्हाला वाचनाची किंवा नवीन काहीतरी शिकण्याची आवड निर्माण होईल. जर तुम्ही मालमत्ता किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही वेळ तुमच्यासाठी एकदम लकी आहे. वडील किंवा गुरूंसमान व्यक्तींकडून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन्स बनतील. तुमच्या पार्टनरसोबतचे ट्युनिंग सुधारेल आणि रिलेशनमध्ये गोडवा येईल.लकी नंबर: 2, लकी कलर: पांढरा
advertisement
3/5
वृश्चिक - शिक्षणाशी संबंधित असलेल्या लोकांच्या मनातील इच्छा या काळात पूर्ण होतील. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिकायचं आहे, त्यांच्यासाठी हा काळ खूपच फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांनी ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी विनाकारण वाद घालू नये, फक्त आपल्या कामावर लक्ष द्या, यश नक्की मिळेल. पैशांच्या बाबतीत दिवस सामान्य राहतील. या काळात जुगार किंवा सट्टेबाजी सारख्या चुकीच्या कामांपासून लांब राहिलेलेच तुमच्या हिताचे असेल.लकी नंबर: 9, लकी कलर: लाल
advertisement
4/5
वृषभ - कामाच्या ठिकाणी तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील आणि तुम्ही तुमची ध्येयं गाठण्यात यशस्वी व्हाल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, ज्यामुळे तुम्ही सुखसोयींवर मनासारखा खर्च करू शकाल. नोकरी करणाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे आणि व्यापाऱ्यांनाही चांगला नफा मिळेल. जर तुम्ही जुन्या एखाद्या आजाराने त्रस्त असाल, तर या काळात तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा दिसून येईल.लकी नंबर: 6, लकी कलर: निळा
advertisement
5/5
तूळ - दैनंदिन व्यापार करणाऱ्यांना नफा मिळवण्यासाठी या काळात थोडी जास्त मेहनत करावी लागेल. अपेक्षित निकाल मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचं सगळं कौशल्य आणि अनुभव पणाला लावावा लागेल. या ट्रान्झिट दरम्यान कोणाशीही वाद घालणं टाळा, कारण विनाकारण होणारी भांडणं तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण करू शकतात. संयम ठेवा आणि कामावर लक्ष केंद्रित करा.लकी नंबर: 7, लकी कलर: गुलाबी(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: जळून जाणार साडेसाती होळीच्या आगीत! शिमग्यावर शुक्राचे राशीपरिवर्तन 5 राशींना भाग्याचे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल