TRENDING:

आजचं हवामान: महाराष्ट्रात पाऊस रिटर्न, कोकणात यलो अलर्ट, मुंबई-ठाण्यासाठी महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
Weather Alert: कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत असून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. पुढील 24 तासांसाठी काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5
महाराष्ट्रात पाऊस रिटर्न, कोकणात यलो अलर्ट, मुंबई-ठाण्यासाठी महत्त्वाचं अपडेट
आजचं हवामान</a> अपडेट जाणून घेऊ. " width="1080" height="1350" /> महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील पावसाचा जोर कायम आहे. आज 5 नोव्हेंबर रोजी पुन्हा राज्यात पावसाची शक्यता असून कोकण किनारपट्टीवर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
मुंबईत आज हवामान ढगाळ राहणार असून, सकाळपासूनच काही भागांमध्ये रिमझिम पावसाच्या सरी सुरू होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढू शकतो. हवामान विभागाने मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः दक्षिण मुंबई, दादर, अंधेरी, बांद्रा, आणि चेंबूर परिसरात अधूनमधून जोरदार सरी पडू शकतात. मुंबईचं कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, आणि किमान 25 अंश सेल्सिअस राहील. उकाड्यासह आर्द्रतेमुळे नागरिकांना अस्वस्थता जाणवू शकते.हवामान विभागाने मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः दक्षिण मुंबई, दादर, अंधेरी, बांद्रा, आणि चेंबूर परिसरात अधूनमधून जोरदार सरी पडू शकतात. मुंबईचं कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, आणि किमान 25 अंश सेल्सिअस राहील. उकाड्यासह आर्द्रतेमुळे नागरिकांना अस्वस्थता जाणवू शकते.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरूच आहे. आजही हवामान विभागाने या दोन्ही शहरांसाठी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दिला आहे.ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, वाशी, बेलापूर आणि पनवेल परिसरात दुपारनंतर पावसाच्या सरी वाढू शकतात. कमाल तापमान सुमारे 30 अंश, तर किमान 24 अंश सेल्सिअस राहील. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे गारवा जाणवेल, परंतु संध्याकाळी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, वाशी, बेलापूर आणि पनवेल परिसरात दुपारनंतर पावसाच्या सरी वाढू शकतात.कमाल तापमान सुमारे 30 अंश, तर किमान 24 अंश सेल्सिअस राहील. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे गारवा जाणवेल, परंतु संध्याकाळी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात आज हवामान विभागानं हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. किनारी भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात आधीच भात शेतीवर पावसाचा परिणाम झाल्याने शेतकरी अधिकच चिंतेत आहेत. पालघरचं कमाल तापमान 30 अंश, तर किमान 23 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
5/5
कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागानं यलो अलर्ट दिला आहे.येथील काही भागांमध्ये 30 ते 50 मिमीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.सततच्या पावसामुळे येथील शेतकऱ्यांच्या भात पिकाचं नुकसान होत असून, पिकं काढण्याचं काम उशिरा होतंय. त्यामुळे कृषी विभागानं सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.येथील काही भागांमध्ये 30 ते 50 मिमीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.सततच्या पावसामुळे येथील शेतकऱ्यांच्या भात पिकाचं नुकसान होत असून, पिकं काढण्याचं काम उशिरा होतंय. त्यामुळे कृषी विभागानं सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
आजचं हवामान: महाराष्ट्रात पाऊस रिटर्न, कोकणात यलो अलर्ट, मुंबई-ठाण्यासाठी महत्त्वाचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल