TRENDING:

Weather Alert : पुढील 24 तास महत्त्वाचे, महाराष्ट्रात कोसळणार पाऊस, या जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
ढगाळ वातावरण, धुक्याची उपस्थिती आणि तापमानातील चढ-उतार यामुळे राज्यात हवामानाचा लहरीपणा वाढला असून, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हवामान कसं राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
advertisement
1/5
पुढील 24 तास महत्त्वाचे, महाराष्ट्रात कोसळणार पाऊस, या जिल्ह्यांना अलर्ट
हिवाळा संपत चालल्याचे स्पष्ट संकेत आता महाराष्ट्राच्या हवामानातून मिळू लागले आहेत. सकाळी हलकासा गारवा जाणवत असला, तरी दुपारच्या वेळेत वाढतं ऊन आणि उष्णता नागरिकांना जाणवू लागली आहे. ढगाळ वातावरण, धुक्याची उपस्थिती आणि तापमानातील चढ-उतार यामुळे राज्यात हवामानाचा लहरीपणा वाढला असून, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हवामान कसं राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
advertisement
2/5
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकण किनारपट्टीवर हवामान अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. सकाळच्या वेळेत हलकं धुके जाणवू शकतं, मात्र दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहील. पावसाची कोणतीही शक्यता नसून, वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. मुंबईत कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून, किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
3/5
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हवामानात बदल जाणवण्याची शक्यता आहे. नाशिक, धुळे, जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान सुमारे 27 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. विदर्भात सकाळच्या वेळेत हवामान प्रामुख्याने निरभ्र राहील, मात्र दुपारनंतर ढगाळ वातावरण वाढण्याचा अंदाज आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहील. दोन्ही विभागांत सकाळी सौम्य गारवा जाणवेल, तर दुपारनंतर वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा अनुभव येण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
पश्चिम महाराष्ट्रात हवामान संमिश्र स्वरूपाचं राहणार आहे. पुणे शहर आणि परिसरात सकाळच्या वेळेत धुक्याची शक्यता असून, त्यानंतर दिवसभर हवामान कोरडं राहील. येथे कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सकाळी सौम्य गारवा जाणवेल, मात्र दुपारनंतर उन्हाचा चटका बसू शकतो.
advertisement
5/5
एकंदरीत पाहता, जानेवारीच्या शेवटी राज्यात थंडीचा जोर कमी होत असून, कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे. काही भागांत धुके, काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलका पाऊस, तर काही ठिकाणी वाढत्या तापमानामुळे उकाडा अशी मिश्र परिस्थिती पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert : पुढील 24 तास महत्त्वाचे, महाराष्ट्रात कोसळणार पाऊस, या जिल्ह्यांना अलर्ट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल