MHADA : आधी येईल त्याला घर मिळेल! म्हाडाच्या बंपर लॉटरीला सुरुवात,अर्ज कुठे अन् कसा कराल?
Last Updated:
Mhada Lottery : सर्वसामान्यांसाठी मोठी खुशखबर आहे आता म्हाडा तुमच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणार असून चला या विषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
advertisement
1/7

स्वता:च घर आणि तेही मुंबई सारख्या महाशहरात घेण्याच ज्यांच स्वप्न आहे आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. नेमका या वेळी म्हाडाची कोणती लॉटरी काढण्यात आलेली आहे त्याबाबत जाणून घेऊयात.
advertisement
2/7
म्हाडा मुंबई मंडळाकडील विविध वसाहतींमधील 118 सदनिका 'प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
advertisement
3/7
इच्छुक नागरिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार आहे. यापूर्वी सोडतीत जाहीर झालेल्या पण विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या घरांचा या योजनेत समावेश आहे.
advertisement
4/7
अर्जदारांनी सर्वप्रथम संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा आणि पसंतीची सदनिका निश्चित करणे या प्रक्रिया सुरू होतील.
advertisement
5/7
सदनिका निश्चित केल्यानंतर 48 तासांच्या आत त्या घराच्या एकूण किमतीच्या 10 टक्के रक्कम ऑनलाइन भरणे बंधनकारक आहे. ठरलेल्या वेळेत रक्कम न भरल्यास सदनिकेवरील दावा रद्द केला जाईल आणि अनामत रक्कम मंडळाकडे जमा होईल.
advertisement
6/7
म्हाडाने स्पष्ट केले आहे की सदनिकांच्या विक्रीसाठी कोणताही एजंट किंवा प्रतिनिधी नियुक्त केलेला नाही. त्यामुळे अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करू नयेत. अशा व्यवहारांबाबत म्हाडा जबाबदार राहणार नाही.
advertisement
7/7
या योजनेअंतर्गत कांदिवली, वडाळा, पवई, मानखुर्द, मालाड, घाटकोपर, विक्रोळी, भायखळा, ताडदेव, लोअर परळ, सायन आणि अंधेरी परिसरातील घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
MHADA : आधी येईल त्याला घर मिळेल! म्हाडाच्या बंपर लॉटरीला सुरुवात,अर्ज कुठे अन् कसा कराल?