TRENDING:

Mumbai Weather Update: मुंबईत गारठा कायम, कोकणात हुडहुडी, आज कसं असेल हवामान?

Last Updated:
Mumbai Weather Update: अवकाळी संकटानंतर मुंबईसह कोकणातील हवामानात बदल जाणवत आहेत. आता मुंबईत गारठा वाढला असून कोकणातही थंडीचा जोर दिसत आहे.  
advertisement
1/5
मुंबईत गारठा कायम, कोकणात हुडहुडी, आज कसं असेल हवामान?
राज्यात डिसेंबरमध्ये हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा हे तिन्ही ऋतू एकत्रच जाणवत आहेत. आता हवामानात पुन्हा बदल झाला असून राज्यात किमान तापमानात वाढ झालीये. मुंबई आणि कोकणात मात्र वेगळी स्थिती जाणवत आहे.
advertisement
2/5
उत्तर भारतातून येणाऱ्या शीत लहरींमुळे मुंबईत गारठा वाढला आहे. डिसेंबर अखेर तापमानात काहीशी वाढ होणार असून त्यानंतर पुन्हा गारठा वाढण्याचा अंदाज आहे.
advertisement
3/5
मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई शहरांत देखील किमान तापमानात काहीशी वाढ होतेय. 31 डिसेंबरपर्यंत हवेत गारवा कायम राहणार असून स्वच्छ सूर्यप्रकाश राहणार आहे.
advertisement
4/5
मुंबईचे आज किमान तापमान 22 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहाटे गारवा तर दुपारी घामाच्या धारा अशी स्थिती मुंबईकरांना सहन करावी लागतेय.
advertisement
5/5
कोकणात वातावरणात देखील बदल जाणवत आहेत. अवकाळी संकटानंतर हवेत गारवा वाढला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या किमान तापमानात घट झालीये. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 19 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Weather Update: मुंबईत गारठा कायम, कोकणात हुडहुडी, आज कसं असेल हवामान?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल