Mumbai Rain: 24 तास झोडपणार, कोकणात IMD कडून हायअलर्ट, मुंबई, ठाण्यात काय स्थिती?
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Weather: राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/5

राज्यात सगळीकडेच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज, 18 जून रोजी संपूर्ण कोकणपट्टा व आसपासच्या भागांत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकण विभागासाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांत काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
advertisement
2/5
मुंबई शहरात सकाळपासूनच आकाशात ढगाळ वातावरण असून, दुपारनंतर मुसळधार पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 40-50 कि.मी.पर्यंत जाण्याचा अंदाज असून, किनारपट्टी परिसरात समुद्र खवळलेला राहणार आहे. तापमान 25 ते 29 अंश सेल्सियसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
ठाणे जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता असून, निचऱ्याच्या भागांत पाणी साचण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. नवी मुंबईत विशेषतः बेलापूर, वाशी, नेरूळ या परिसरांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. नवी मुंबई महापालिकेने आवश्यक यंत्रणा सतर्क ठेवली असून, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन केले आहे.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर आज अधिक राहणार असून, काही ठिकाणी ढगफुटीच्या स्वरूपाचे पावसाचे प्रमाण नोंदवले जाऊ शकते. समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या भागात नागरिकांना समुद्रकिनारी न जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
advertisement
5/5
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिवृष्टीचा अंदाज असून, रायगडसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. 28–29 ° से आणि किमान 26–27 ° से दरम्यान राहील. रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी आहे; नदी–नाले वाहून जाण्याची, पूर येण्याची आणि डोंगर दोऱ्यावर भूस्खलनाची शक्यता गंभीर आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Rain: 24 तास झोडपणार, कोकणात IMD कडून हायअलर्ट, मुंबई, ठाण्यात काय स्थिती?