Mumbai Weather Today : पुढील 24 तास धोक्याचे, कोकणात पुन्हा मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
mumbai weather : मुंबईत आज दिवसभर जोरदार सरींचा अंदाज आहे. काल काही भागांत पावसाचा जोर वाढला होता आणि आज तर हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
1/5

हवामान विभागाने आज मुंबईसह संपूर्ण कोकणपट्टीत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांत अधूनमधून जोरदार सरी बरसल्यानंतर आज मात्र बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार आहे.
advertisement
2/5
मुंबईत आज दिवसभर जोरदार सरींचा अंदाज आहे. काल काही भागांत पावसाचा जोर वाढला होता आणि आज तर हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील खालच्या भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबई परिसरात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या भागांमध्येही यलो अलर्ट देण्यात आला असून मध्य रेल्वेच्या मार्गांवर मुसळधार पावसामुळे सेवा विस्कळीत होण्याची शक्यता असते. त्यामुळेब हवामान विभागाने आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात गेल्या दोन–तीन दिवसांपासून सतत पावसाचा जोर आहे. आजही या जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे काही भागांत मुसळधार तर काही भागांत मध्यम पावसाच्या सरी पडतील. वार्‍याचा वेग मध्यम ते जोरदार राहील आणि दमट हवामान जाणवेल.
advertisement
5/5
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर कायम राहणार आहे. या तीनही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून आजही अनेक भागांत पाण्याची तुंबळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Weather Today : पुढील 24 तास धोक्याचे, कोकणात पुन्हा मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट