Mumbai Rain: कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईला यलो अलर्ट, पाहा आजचं हवामान अपडेट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Rain: मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकण परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
advertisement
1/5

आज 23 जून 2025 रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकण परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे आणि काही भागांत हलक्याशा सरी सुरूही झाल्या आहेत. दुपारनंतर व विशेषतः संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
2/5
मुंबईत, विशेषतः दादर, सायन, कुर्ला, चेंबूर, अंधेरी आणि मालाड या भागांमध्ये जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. सकाळी हलका पाऊस असून, दुपारनंतर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पावसाने आज जोरदार हजेरी लावल्यास लोकल ट्रेन उशिरा धावण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे. हवामान ढगाळ राहील आणि आर्द्रतेमुळे उकाडाही जाणवेल.
advertisement
3/5
ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी आणि मुरबाड परिसरात सतत पावसाचे सत्र सुरू असून, काही भागांत रस्ते जलमय होण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात डहाणू, बोईसर, तलासरी, वसई-विरार आणि जव्हार येथे मध्यम ते जोरदार पावसाचा जोर कायम आहे. किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे समुद्रात मच्छिमारी व प्रवास यावर बंदी घालण्यात आली आहे.
advertisement
4/5
आज 23 जून 2025 रोजी नवी मुंबईत (वाशी, नेरुळ, पनवेल सामील) सकाळपासूनच आकाश ढगाळ राहील आणि दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता वाढली आहे. तापमान सुमारे 29–30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर रात्री किमान तापमान 27–28 अंश सेल्सिअस असेल.
advertisement
5/5
कोकण विभागात, विशेषतः रत्नागिरी, महाड, चिपळूण, खेड, देवगड, मालवण, वेंगुर्ला व सावंतवाडी भागात प्रचंड पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे आज या भागामध्ये आज 23 जून 2025 रोजी कोकण विभागात (रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, महाड, चिपळूण, सावंतवाडी) आकाश मोठ्या प्रमाणात ढगाळ असून, मुसळधार पावसाची सतत शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Rain: कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईला यलो अलर्ट, पाहा आजचं हवामान अपडेट