Mumbai Weather: मुंबईकर 12 ते 4 घरीच थांबा, पुढील 24 तासांसाठी धोक्याचा अलर्ट, आजचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Weather: मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये उष्णतेची तीव्रता चांगलीच वाढली आहे. पुढील काही दिवस नागरिकांना उन्हापासून बचावासाठी काळजी घ्यावी लागेल.
advertisement
1/7

मे महिन्याची सुरुवात होताच महाराष्ट्रात उष्णतेचा कडाका चांगलाच जाणवू लागला आहे. विशेषतः मुंबई, नवी मुंबई आणि पालघर या परिसरांमध्ये तापमानात सातत्याने वाढ होत आहे. आज, 2 मे रोजी हवामानात मोठे बदल जाणवणार असून नागरिकांनी उष्माघातापासून बचावासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.
advertisement
2/7
मुंबई शहरात आज आकाश निरभ्र असून, कमाल तापमान सुमारे 35 अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच ऊन तापलेले असून, हवामान कोरडे आणि दमट राहील.
advertisement
3/7
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत मुंबईमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. यामुळे शहरातील उष्णतेची तीव्रता काही दिवस कायम राहणार आहे
advertisement
4/7
नवी मुंबईतही हवामान उष्ण असून, कमाल तापमान सुमारे 34 अंश सेल्सियस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सियस दरम्यान आहे. येथेही आकाश निरभ्र असून, हवामानात आर्द्रता जाणवते.
advertisement
5/7
उष्णतेमुळे मुंबईकर त्रस्त असून, सार्वजनिक ठिकाणी उन्हापासून संरक्षण घेण्यासाठी छत्री, टोपी यांचा वापर वाढला आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस कोरडे हवामान राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
advertisement
6/7
पालघर जिल्ह्यातही उन्हाचे प्रमाण वाढले आहे. येथे कमाल तापमान 36 अंश सेल्सियसच्या जवळ पोहोचले असून, किमान तापमान सुमारे 27 अंश आहे. कोरड्या हवामानामुळे शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. विशेषतः ग्रामीण भागात दुपारच्या वेळेत तापमान अत्यंत असह्य होऊ लागले आहे.
advertisement
7/7
सर्वच भागांमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे, प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, हलके आणि सैल कपडे परिधान करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. उष्माघाताची शक्यता लक्षात घेता, लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजारी नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Weather: मुंबईकर 12 ते 4 घरीच थांबा, पुढील 24 तासांसाठी धोक्याचा अलर्ट, आजचा हवामान अंदाज