TRENDING:

Navratri 2025: नवरात्रीनिमित्त यंदा मुंबईतील देवींच्या या 5 प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या!

Last Updated:
नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाचं पर्व. या काळात संपूर्ण महाराष्ट्र देवीच्या भक्तीनं न्हालेला असतो पण मुंबईत काही खास अशी देवीची मंदिरं आहेत जिथे नवरात्रीचा जणू स्वर्गीय अनुभव मिळतो. मुंबईसारख्या धकाधकीच्या महानगरात जिथे लोक रात्रंदिवस धावत असतात तिथंही नवरात्रीमध्ये एक विलक्षण भक्तिभाव पसरतो. नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या दरम्यान मुंबईतील काही मंदिरं अशी आहेत जिथे भक्ती आणि परंपरेचा संगम पाहायला मिळतो. ही मंदिरं केवळ धार्मिक स्थळं नाहीत तर अनेकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. तर मुंबईतील ही ५ प्रसिद्ध देवीची मंदिरं जिथे आवश्यक भेट द्या.
advertisement
1/7
नवरात्रीनिमित्त यंदा मुंबईतील देवींच्या या 5 प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या!
नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाचं पर्व. या काळात संपूर्ण महाराष्ट्र देवीच्या भक्तीनं न्हालेला असतो पण मुंबईत काही खास अशी देवीची मंदिरं आहेत जिथे नवरात्रीचा जणू स्वर्गीय अनुभव मिळतो. मुंबईसारख्या धकाधकीच्या महानगरात जिथे लोक रात्रंदिवस धावत असतात तिथंही नवरात्रीमध्ये एक विलक्षण भक्तिभाव पसरतो.
advertisement
2/7
नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या दरम्यान मुंबईतील काही मंदिरं अशी आहेत जिथे भक्ती आणि परंपरेचा संगम पाहायला मिळतो. ही मंदिरं केवळ धार्मिक स्थळं नाहीत तर अनेकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. तर मुंबईतील ही ५ प्रसिद्ध देवीची मंदिरं जिथे आवश्यक भेट द्या.
advertisement
3/7
मुंबईचे नाव "मुंबई" हे मूळतः "मुंबा" या देवीच्या नावावरून आले आहे. मुंबा देवी मंदिर हे मुंबईतील एक अत्यंत ऐतिहासिक आणि धार्मिक महत्वाचं स्थान आहे. नवरात्रीच्या दरम्यान येथे विशेष पूजा, आरती आणि भजनाचा आयोजन केले जाते.मुंबा देवीला महाराष्ट्रात आणि खासकरून मुंबईत "समुद्राची रक्षक देवी" मानलं जातं. नवरात्रीत देवीचे विशेष पूजन केले जाते.
advertisement
4/7
महालक्ष्मी मंदिर मुंबईतील एक अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या तिन्ही देवींच्या मूर्तिंचा वास आहे. महालक्ष्मी मंदिर हे कुलाबा परिसरात स्थित आहे आणि येथील भव्यतेने आणि शांततेने भक्तांना आकर्षित केलं आहे. नवरात्रीच्या काळात, विशेष पूजेची आणि "हवन"चे आयोजन होते.
advertisement
5/7
वरळी जरीमारी माता मंदिर मुंबईतील वरळी परिसरात स्थित आहे. हे मंदिर जरीमारी माता ज्याला 'वणी माता' म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराच्या परिसरात देवीची पूजा अर्चा केली जाते. जरीमारी माता मंदिर एक धार्मिक ठिकाण म्हणून महत्त्वाचे मानले जाते. मंदिराच्या आसपास निसर्गाने भरलेली एक शांतता आहे, जी भक्तांना आध्यात्मिक शांती देते.
advertisement
6/7
प्रभादेवी मंदिर ज्याला प्रभावती देवी मंदिर म्हणूनही ओळखले जाते हे मुंबईतील दादरमधील प्रभादेवी परिसरात स्थित एक मंदिर आहे . मुख्य देवता प्रभावती देवीचे प्रतिनिधित्व करणारी मूर्ती १२ व्या शतकातील आहे. तथापि मंदिर स्वतः १७१५ मध्ये बांधले गेले होते त्यामुळे ते ३०० वर्षे जुने आहे. प्रभादेवी मंदिर हे मुंबईतील अत्यंत प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर प्रभादेवीला समर्पित आहे, ज्या देवीला मुंबईच्या पश्चिम किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी पूजा केली जाते. येथे नवरात्री आणि अक्षय तृतीया सणांच्या वेळेस मोठ्या संख्येने भक्त येतात. प्रभादेवी मंदिर हे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे आहे आणि येथे नियमितपणे भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येतात.
advertisement
7/7
मुंबईमधील सुप्रसिद्ध काळबादेवी मंदिराच्या नावावरून तेथील परिसर देखील ओळखला जातो. हे मंदिर तीनशे वर्षांपूर्वीचे आहे, असे म्हणतात. मुंबईतील महत्त्वाच्या आणि गजबलेल्या परिसरामध्ये काळबादेवीचे मंदिर आहे. नवरात्रौत्सवामध्ये भाविकांची मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. नवरात्रौत्सवामध्ये परंपरा प्रथेप्रमाणे येथे धार्मिक पूजाविधी होत असतात, नवमीला येथे हवनाचेही आयोजन करण्यात येते. काळबादेवीला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Navratri 2025: नवरात्रीनिमित्त यंदा मुंबईतील देवींच्या या 5 प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल