Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचं कमबॅक, 21 जिल्ह्यांना अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आगामी काही दिवसांमध्ये राज्यामध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. 25 सप्टेंबर रोजी राज्यातील एकूण 21 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/7

आगामी काही दिवसांमध्ये राज्यामध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकत असून यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 27, 28 आणि 29 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 25 सप्टेंबर रोजी राज्यातील एकूण 21 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. पाहुयात 25 सप्टेंबर रोजी राज्यामध्ये हवामान कसं असेल.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. तर कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या तीनही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पाचही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. परंतु उत्तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याला हवामान विभागाने अलर्ट दिलेला नाही.
advertisement
5/7
मराठवाड्यातील आठ पैकी पाच जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड हे ते पाच जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
6/7
तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर उर्वरित बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या आठ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
7/7
दरम्यान 26, 27 आणि 28 सप्टेंबर रोजी राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र हे पश्चिमेकडे सरकत असून त्याचा प्रभाव मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ असा संपूर्ण राज्यावर असणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचं कमबॅक, 21 जिल्ह्यांना अलर्ट