मराठवाड्यात इतका मुसळधार पाऊस का झाला, आणखी किती दिवस मुक्काम?
पाच एकर क्षेत्रामध्ये नदीचा पाणी आल्याने संपूर्ण मका व कांदा हा पीक पाण्याखाली गेला आहे. शेताला तळ्याचे स्वरूप आले असून छातीपर्यंत पाणी शेतामध्ये जमा झाला आहे.हराळवाडी गावातील घोडके वस्ती येथे राहणारे धोंडीबा वाघमोडे यांनी पाच एकरात कांदा आणि मक्याची लागवड केली होती. 2 एकर कांदा व 3 एकर मका पिकाची लागवड करण्यासाठी धोंडीबा यांना एक ते दीड लाख रुपयापर्यंतचा खर्च आला होता.पण सीना नदी दुथडी भरून वाहत असून नदीचा पाणी शेतात गेल्याने शेताला तळ्याचे स्वरूप आले असून जवळपास तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान शेतकरी धोंडीबा वाघमोडे यांचे झाले आहे.
advertisement
चार मेट्रो मार्गिकेंसाठी एकच तिकीट, ‘One Ticket’ ॲपमधून बुक करा अन् कुठेही फिरा
विशेष म्हणजे हराळवाडी गावातील घोडके वस्ती पासून सीना नदी हे तीन ते चार किलो मीटर अंतरावर असून देखील शेतात पाणी साचले आहे. मारुती ढगे यांनी 5 एकर शेती बटाईवर करण्यासाठी घेतली होती. पण सीना नदीचा पाणी शेतात आल्याने पाच एकर क्षेत्र पाण्याखाली गेल्याने पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. दोन एकरात मका तर चार एकरात कांद्याची लागवड केली होती. मका लागवडी साठी एकराला 40 हजार रुपये खर्च केला होता. तर कांदा लागवडीसाठी एकरी 60 हजार रुपये खर्च केला होता. तर सर्व मिळून दीड रुपयापर्यंत खर्च ढगे यांनी लागवडीसाठी केला होता. कोणताही अधिकारी, तलाठी आतापर्यंत पंचनामे करण्यासाठी आल्या नसल्याची खंत शेतकऱ्यांन व्यक्त केली.