Famous Beaches near Mumbai : मुंबई जवळचे हे 5 प्रसिद्ध बीच, पर्यटकांसाठी आहेत बेस्ट ऑप्शन, photos
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
समुद्रकिनारा पर्यटकांना कायम आकर्षित करतो. समुद्राच्या कडेला लाटा पाहात बसणे कित्येकांसाठी पर्वणी असते. निळाशार समुद्र, पांढरी वाळू अन् डोळ्यांना दिसेल तिथपर्यंत फक्त पाणीच पाणी, हे दृश्य बघायला प्रत्येकालाच आवडते. या पावसाळ्यामध्ये मुंबईच्या जवळपास असलेल्या बीचवर फिरायला जाण्याची वेगळीच मजा असते. त्यामुळे तुम्ही तुमचा विकेंड अगदी मजेत फॅमिली आणि मित्र परिवारासह घालवू शकता. तर मग मुंबईच्या जवळ असलेली असे बीच कोणते आहेत, हेच आपण जाणून घेऊयात. (प्रियंका जगताप/मुंबई, प्रतिनिधी)
advertisement
1/5

जुहू बीच - मुंबईतील सर्वात लांब समुद्रकिनारा जुहू बीचला लाभला आहे. हा भारतातील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. जुहू बीच हा शांत वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्य तसेच स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहे. जुहू बीच हे मुंबईतील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे, जे स्थानिक लोकांसोबतच पर्यटकांमध्येही खूप लोकप्रिय आहे. त्यामुळेच इथे दररोज हजारो पर्यटक, त्यांचे जोडपे, मित्र आणि कुटुंबासह भेट देण्यासाठी येतात.
advertisement
2/5
मनोरी बीच - हा बीच मुंबईपासून फक्त 36 किलोमीटर अंतरावर आहे. शहराच्या जवळ असलेल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांमध्ये मनोरी बीचचा समावेश होतो. पर्यटकांमध्ये प्रसिध्द असलेल्या या बीचला लोक 'मिनी गोवा' असेही म्हणतात. येथे जेवणाची उत्तम सोय असणारे रेस्टॉरंट तर आहेतच, त्यासोबत स्विमिंग आणि बोटीत बसून समुद्राचा फेरफटका मारण्याचा आनंददेखील तुम्ही घेऊ शकता.
advertisement
3/5
मारवे बीच - मुंबईच्या जवळ असलेला हा बीचदेखील विकेंडसाठी पर्यटकांच्या पसंतीला उतरतो. येथे रात्री चालणाऱ्या फुलमून नाईट पार्टीसाठी ही बीच चांगलाच प्रसिध्द आहे. शहराच्या गर्दीपासून दूर, पिकनीकसाठी हा बीच परफेक्ट डेस्टीनेशन आहे. याठिकाणी तुम्ही स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाददेखील घेऊ शकता.
advertisement
4/5
वसई बीच - मुंबईपासून 68 किमी अंतरावर असलेला वसई बीच ही देखील एक दिवसाच्या पिकनिकसाठी परफेक्ट जागा आहे. सुंदर समुद्रकिनारी तुम्ही कुटुंबासोबत अगदी आनंदात विकेंड घालवू शकता. हा बीच निळा समुद्र आणि पांढरी रेती या दोन गोष्टींसाठी ओळखला जातो. अगदी शांत वातावरण असलल्या या बीचवर फिरण्यासोबतच तुम्ही वसई किल्ला, रेमेडी चर्च, हेदवडे महालक्ष्मी मंदिर आणि वसई बंदर इत्यादी ठिकाणीही जाऊ शकता.
advertisement
5/5
अलीबाग बीच - मुंबईकरांना हा बीच तुलनेने थोडा दूर म्हणजे शहरापासून 92 किमी अंतरावर आहे. पण मुंबईच्या जवळ निळाशार समुद्र, काळी रेती असणारा समुद्रकिनारा असलेला हा बीच एक परफेक्ट ऑप्शन आहे. नोव्हेंबर ते मार्च दरम्यानचा काळ हा अलीबाग बीचवर फिरण्यासाठी सर्वोत्तम असतो. या बीचवर तुम्ही कुलाबा फोर्टमध्ये फेरीची सफर, काइट सर्फिंग आणि पॅराग्लायडींगसारख्या भन्नाट गोष्टींचाही आनंद घेऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Famous Beaches near Mumbai : मुंबई जवळचे हे 5 प्रसिद्ध बीच, पर्यटकांसाठी आहेत बेस्ट ऑप्शन, photos