TRENDING:

Mumbai Rain: मुंबईकर, आज अलर्ट राहा! धो धो कोसळणार, पुढचे 48 तास पावसाचे!

Last Updated:
Mumbai Rain: गेल्या काही काळात कोकणात मान्सूनचा जोर कायम आहे. आज मुंबईसह ठाणे परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/5
Mumbai Rain: मुंबईकर, आज अलर्ट राहा! धो धो कोसळणार, पुढचे 48 तास पावसाचे!
राज्यातील काही भागात मान्सूनचा जोर कायम आहे. कोकण किनारपट्टी, मुंबई महानगर आणि नजीकच्या उपनगरांमध्ये 2 जुलै रोजी ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून दुपारनंतर जोरदार पाऊस होईल. या भागात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
2/5
मुंबईकरांना तिन्ही ऋतू सारखेच असतात. पण उन्हाळ्यातील गर्मीचा सामना त्यांना पावसाळ्यातही करावा लागतोय. आज मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण असून, दुपारनंतर काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने 48 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मंगळवारी दिवसभरात शहरात 45 मिमी पावसाची नोंद झाली होती.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबई परिसरात काल दिवसभर जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. नवी मुंबईतील बेलापूर, वाशी आणि नेरुळ भागात काही काळ पाणी साचले होते. आज पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला असून 48 तासांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागात जोरदार तर काही ठिकाणी आज दुपारी व संध्याकाळच्या सुमारास हलक्या सरी पडू शकतात.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी शेतीची कामं सुरू आहेत. तर या भागातून मुंबईत नोकरी व्यवसायासाठी येणाऱ्यांना लोकल सम्येसला समोर जावं लागलं. डहाणू, तलासरी, वाडा आणि जव्हार परिसरात जोरदार सरी अनुभवास आल्या. आज दिवसभर मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता असून, स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
5/5
2 जुलै रोजी कोकण विभागात ढगाळ वातावरण असून जोरदार पावसाचा अंदाज आहे. गेले दोन दिवस मुसळधार पावसाने कोकणात दमदार हजेरी लावली होती. अनेक भागांत 80 ते 100 मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली होती. त्यामुले शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला वेग दिला असून, पावसामुळे नद्या-नाल्यांना उधाण आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Rain: मुंबईकर, आज अलर्ट राहा! धो धो कोसळणार, पुढचे 48 तास पावसाचे!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल