TRENDING:

Mumbai Rain: कोकणात पावसाचं धुमशान, मुंबई-ठाण्यात धो धो कोसळणार, आजचा हवामान अंदाज

Last Updated:
Weather Alert: कोकणात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. मुंबई, ठाण्यासह उपनगरांत जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
1/5
कोकणात पावसाचं धुमशान, मुंबई-ठाण्यात धो धो कोसळणार, आजचा हवामान अंदाज
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली होती.आज, 21 जुलै रोजी, या भागांमध्ये पावसाचा जोर जास्त प्रमाणात जाणवू शकतो. मात्र काही भागात पावसाची तीव्रता कमी झालेली पाहायला मिळेल. त्यामुळे हवामान अधिक दमट आणि उष्ण झाले आहे. बहुतांश भागांत रिमझिम स्वरूपात हलक्या सरी पडत असल्या तरी, ऊन आणि उकाडा यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
advertisement
2/5
मुंबई शहरासह उपनगरात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून, दुपारी पावसाचा जोर वाढेल. हवामान दमट असल्याने उष्णता अधिक जाणवत आहे. मुंबईत आजचे कमाल तापमान अंदाजे 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान सुमारे 26 अंश सेल्सिअस राहील. आज हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
3/5
ठाणे व नवी मुंबई परिसरात रविवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला होता. आज पुन्हा पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या भागात यलो अलर्ट जारी केला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण असून, काही भागांत रिमझिम सरी सुरु आहेत. येथील कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस आहे आणि किमान तापमान सुमारे 25 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची विश्रांती असून, हवामान ढगाळ आहे. काही भागांत हलक्या सरी झाल्या आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता दिसत नाही. आज येथे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहील. दमट वातावरणामुळे ग्रामीण व सखल उकाडा वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
कोकणच्या किनारपट्टीवर मागील दोन दिवसांत जोरदार पावसाने हजेरी लावली होती. आज पुन्हा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. आज ढगाळ वातावरण असून जोरदार पावसाची शक्यता आहे. समुद्रकिनारी दमटता अधिक असून, कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील. मच्छिमारांनी समुद्राकडे जाताना हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Rain: कोकणात पावसाचं धुमशान, मुंबई-ठाण्यात धो धो कोसळणार, आजचा हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल