TRENDING:

मुंबईच्या 'या' मार्केटमध्ये मिळतात जगभरातले मसाले, एकदम स्वस्त!

Last Updated:
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जगभरातील मसाले स्वस्त मिळणारं एक मार्केट आहे.
advertisement
1/5
मुंबईच्या 'या' मार्केटमध्ये मिळतात जगभरातले मसाले, एकदम स्वस्त!
भारत हा प्राचीन काळापासून मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या देशात अनेक दुर्मीळ आणि औषधी गुणधर्म असलेल्या मसाल्यांचं उत्पादन घेतलं जातं. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एक असं मार्केट आहे, जिथे जगभरातील मसाले अगदी स्वस्त मिळतात. कोरोना काळातही हे मार्केट अखंड सुरू होतं.
advertisement
2/5
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच APMC मार्केट ही नवी मुंबईतील वाशीची वेगळी ओळख आहे. वाशी, तुर्भे, सानपाडा स्थानकापासून हे मार्केट जवळ आहे. या बाजारात फळं, भाज्या, मसाले, खाद्यपदार्थ अशा अनेक गोष्टी घाऊक दरात मिळतात. यापैकीच एक असलेलं मसाला मार्केट गेल्या 31 वर्षांपासून सुरू आहे.
advertisement
3/5
तब्बल दोनशेपेक्षा जास्त व्यापाऱ्यांची याठिकाणी मसाल्याची दुकानं आहेत. मिरची, काश्मिरी मिरची, धने, हळद, दालचिनी, खसखस, लवंग, वेलची, जायफळ, खडा मसाला, जिरे, मोहरी, खोबरं, चिंच, इत्यादी प्रकारचे मसाले या बाजारात मिळतात.
advertisement
4/5
मसाला व्यापारी अमरीश बरोट यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हे आशिया खंडातील सर्वात मोठं मार्केट आहे. यामधील मसाला मार्केटला यंदा 32 वर्ष पूर्ण झाली आहेत. अमरीश भाई 1980 पासून मसाला व्यवसायात काम करत आहेत. सुरुवातीला मोहम्मद अली रोडवर मोठं मार्केट होतं. मात्र 1991 साली ते वाशीमध्ये स्थलांतरित करण्यात आलं. सर्व प्रकारचे मसाले होलसेल भावात या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर मसाल्याचा दर हा दररोज चढता-उतरता असतो. डी विभागात होलसेल तर ई विभागात रिटेल असे दोन्ही प्रकारचे मसाले तुम्हाला इथं मिळतात.
advertisement
5/5
'कोरोना काळात खाद्यपदार्थांची विक्री थांबवू नका, अशी आम्हाला सरकारने विनंती केली होती. त्यावेळी आम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केलं होतं. आमचे अनेक व्यापारी मित्र, माथाडी कामगारांना जीव गमावावा लागला. मात्र आम्ही मागे हटलो नाही. मार्केट सुरू ठेवलं. कोरोनाकाळात आमचं खूप नुकसान झालं. परंतु आता हळूहळू बाजारपेठ पुन्हा उभी राहतेय,' असं अमरिश भाई सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
मुंबईच्या 'या' मार्केटमध्ये मिळतात जगभरातले मसाले, एकदम स्वस्त!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल