Indian Railway : भारतातील 5 सर्वात मोठे रेल्वे स्टेशन, एकावेळी थांबतात 20 पेक्षा जास्त ट्रेन
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
तुम्हाला जगातील सर्वात लांब मोठं रेल्वे स्टेशन माहितीय का? आज भारतातील 5 मोठ्या रेल्वे स्टेशनविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/7

दैनंदिन जीवनात प्रवासासाठी भारतातील लोकांचा कल रेल्वेकडे असतो. त्यामुळे भारतातील रेल्वेची जगभर चर्चा आहे. रेल्वे नेटवर्कविषयी बोललो तर भारताचा क्रमांक चौथा लागतो.
advertisement
2/7
तुम्हाला जगातील सर्वात लांब मोठं रेल्वे स्टेशन माहितीय का? आज भारतातील 5 मोठ्या रेल्वे स्टेशनविषयी जाणून घेऊया.
advertisement
3/7
हावडा जंक्शन हे देशातील सर्वात मोठं आणि जुनं रेल्वे स्थानक आहे. हे पश्चिम बंगालच्या राजधानीत असून याला देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन देखील म्हटलं जातं. या स्थानकावर 23 प्लॅटफॉर्म असून 26 रेल्वे लाईन आहेत. ज्यातून दररोज सुमारे 600 गाड्या जातात.
advertisement
4/7
सियालदह रेल्वे स्टेशनवर 21 प्लॅटफॉर्म असून येथे 27 रेल्वे ट्रॅक आहेत. हे स्टेशन 158 वर्षापूर्वी सुरु झाले.
advertisement
5/7
छत्रपती शिवाजी टर्मिनल हे देखील खूप लोकप्रिय आणि गजबजलेलं स्थानक आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याची नोंद आहे. याला व्हिक्टोरिया टर्मिनस असेही म्हणतात.
advertisement
6/7
नवी दिल्ली रेल्वे स्टेशन भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. या व्यतिरिक्त, हे सर्वाधिक कमाई करणारे रेल्वे स्टेशन देखील आहे. जवळपास, दररोज सुमारे 400 ट्रेन त्याच्या रुळांवरून जातात.
advertisement
7/7
चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशन चेन्नई शहरातील मुख्य रेल्वे स्टेशन आहे. हे स्टेशन कोलकाता, नवी दिल्ली, मुंबईसह भारताच्या उत्तर भागाशी जोडतं. दररोज सुमारे 550,000 लोक स्टेशनचा वापर करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Indian Railway : भारतातील 5 सर्वात मोठे रेल्वे स्टेशन, एकावेळी थांबतात 20 पेक्षा जास्त ट्रेन