TRENDING:

Dana Cyclone: 120 चा स्पीड, क्षणात सारं काही उद्ध्वस्त करणाऱ्या चक्रीवादळाला दाना नाव कसं मिळालं?

Last Updated:
Dana Cyclone: चक्रीवादळाला Dana हे नाव कसं मिळालं, कोण ठरवतं Cyclone ची नावं?
advertisement
1/7
120 चा स्पीड, क्षणात सारं उद्ध्वस्त करणाऱ्या चक्रीवादळाला Dana नाव कसं मिळालं?
मुंबई : ताशी 110 ते 120 किमी स्पीड आणि सारं काही उद्ध्वस्त करणारं चक्रीवादळ पुढच्या 24 तासात धडकण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा किनारपट्टीवर हे चक्रीवादळ धडकणार असल्याचं हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर किनारपट्टीलगतच्या राज्यांनाही हायअलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
2/7
या चक्रीवादळाचं नाव दाना असं आहे. दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयं आणि कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तर समुद्रकिनारपट्टीजवळच्या गावांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
advertisement
3/7
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 153 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर कोणार्क मंदिर भाविकांसाठी 2 दिवस बंद राहणार आहे. या चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टीलगतच्या भागांवर मोठ्या प्रमाणात होणार आहे. महाराष्ट्रातही पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात हायअलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
4/7
या चक्रीवादळाला दाना नाव कसं मिळालं? कोणत्या देशानं दिलं त्याचा अर्थ काय? चक्रीवादळाचं नाव कसं ठरवलं जातं? हे तुम्हाला माहिती आहे का? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
5/7
चक्रीवादळाला दाना हे नाव सौदी अरेबियानं दिलं आहे. उत्तर हिंद महासागरासाठी WMO च्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळ नामकरण प्रणालीमध्ये सहभागी होणाऱ्या 14 देशांपैकी हा एक आहे.
advertisement
6/7
'दाना' हे नाव अरबी भाषेतून आले आहे, म्हणजे 'उदारता' किंवा 'उपहार अर्थात भेट'. प्रत्येक देशानं आपल्या प्रादेशिक भाषेतून काही नावं दिलेली आहेत. येत्या काही वादळांची नावंही ठरलेली आहेत. प्रत्येक देश आळीपाळीने ही नावं देत असतो.
advertisement
7/7
मागच्या काही चक्रीवादळाची नाव- म्यानमारने तौकते, इराणने नामित अशी चक्रीवादळाची नावं दिली आहे. रेमल, मिचौंग, मिधिली, हामून, बिपरजॉय, निसर्ग अशी आतापर्यंत आलेल्या चक्रीवादळाची नावं होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Dana Cyclone: 120 चा स्पीड, क्षणात सारं काही उद्ध्वस्त करणाऱ्या चक्रीवादळाला दाना नाव कसं मिळालं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल