photos : महिला सरपंचाची कमाल, गावात सुरू केल्या अशा सुविधा की गावकरीही म्हणताय, वाह!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
महिला सरपंचाने जर ठरवलं तर गावाचा विकास कसा होतो, हे एका महिलेने सिद्ध करुन दाखवले आहे. या गावात गावकऱ्यांना एकाच छताखाली सुविधा देण्यासाठी मॉडेल सचिवालय तयार करण्यात आले आहे. मॉडेल आदर्श सचिवालयाचा लाभ घेता यावा यासाठी महिला सरपंचाने एक अनोखा प्रयोग करून सेल्फी पॉइंट तयार केला आहे. सचिवालयात येणाऱ्या ग्रामस्थांना काम आटोपल्यानंतर सेल्फीही घेता येणार आहे. तसेच गावाबरोबरच पर्यावरण वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार फलदायी ठरत आहे. जाणून घेऊयात, या गावाची कहाणी. (मुकेश पांडेय/मिर्जापुर, प्रतिनिधी)
advertisement
1/7

उत्तरप्रदेशातील मिर्झापूर येथील बरकछा कला गावाची ही कहाणी आहे. येथे मॉडल सचिवालय बनवले आहे. सचिवालयात बँक सखी, किसान सेवा केंद्र, सहज जनसेवा केंद्र आणि बियाणे भांडार तयार करण्यात आले आहे. कुठेही प्लास्टिक फेकले जाऊ नये, यासाठी प्लास्टिक बँक तयार करण्यात आली आहे.
advertisement
2/7
सचिवालयात येणाऱ्या गावकऱ्यांसाठी शौचालयासह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बरकछा कलां येथील प्रसिद्ध गुलाब जामुन आणि जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती देण्यात आली आहे. संपूर्ण सचिवालयात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. व्यवस्थेत बदल झाल्यानंतर त्याचा फायदा गावकरी घेत आहेत.
advertisement
3/7
गावाच्या महिला सरपंच गुलशन देवी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मॉडेल सचिवालयाचे बांधकाम झाल्यानंतर त्याचा लाभ गावकरी घेत आहेत. सचिवालयाच्या कायापालटासाठी केलेले प्रयत्न पूर्ण झाले आहेत.
advertisement
4/7
एका अनोख्या प्रयोगात आम्ही सचिवालयात सेल्फी पॉइंट तयार केला आहे. सुविधांचा लाभ घेतल्यानंतर गावकरी सेल्फीही घेतात. पूर्वीपेक्षा चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत, असे त्या म्हणाल्या.
advertisement
5/7
ग्रामपंचायत सदस्य अभिषेक तिवारी यांनी सांगितले की, आधी आम्ही इथे यायचो तेव्हा आवश्यक त्या सुविधा नव्हत्या. येथील गावकऱ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागू नये आणि सुमारे 85 टक्के सुविधांचा लाभ घेता यावा, असा माननीय सरपंच यांच्या नेतृत्वाखाली आमचा प्रयत्न होता. आज गावाचा होत असलेला विकास सर्वांना दिसत आहे.
advertisement
6/7
गावकरी श्याम सुंदर मौर्य यांनी सांगितले की, आधीपेक्षा चित्र बदलले आहे. पूर्वी सुविधा घेण्यासाठी सीएचसीमध्ये जावे लागत होते. उत्पन्नाचा दाखला असो की जात प्रमाणपत्र असो, निवासस्थानाचे बांधकाम असो किंवा बँक आणि शेतीचे काम असो, आता ही सर्व कामे एकाच ठिकाणी केली जातात.
advertisement
7/7
सचिवालयात बनवलेला सेल्फी पॉइंट वृक्षांचे संरक्षण आणि आपला प्राचीन वारसा जपण्याचा मोठा संदेश देत आहे. सध्याचे ग्रामपंचायत प्रशासन खूप चांगले काम करत आहे, असेही ते म्हणाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
photos : महिला सरपंचाची कमाल, गावात सुरू केल्या अशा सुविधा की गावकरीही म्हणताय, वाह!