TRENDING:

Omar Abdullah Love Story : हॉटेलमध्ये ओळख, प्रेम, आंतरधर्मीय लग्न अन् आता घटस्फोटासाठी 15 वर्षांपासून कोर्टात

Last Updated:
Omar Abdullah: गेल्या १५ वर्षांपासून उमर अब्दुल्ला हे पत्नी पायलपासून वेगळे राहत आहेत. त्यांनी घटस्फोटासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. पण अद्याप त्यांना घटस्फोट मिळालेला नाही.
advertisement
1/7
प्रेम, आंतरधर्मीय लग्न अन् आता घटस्फोटासाठी कोर्टात, कोण आहेत उमर अब्दुल्ला?
काश्मीरमध्ये दहा वर्षांनी निवडणूक झाली असून मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची सध्या चर्चा आहे.
advertisement
2/7
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते असलेल्या उमर अब्दुल्ला हे त्यांच्या लव्ह स्टोरी आणि घटस्फोटमुळे चर्चेत आले होते. उमर अब्दुल्ला यांना घटस्फोटासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
advertisement
3/7
उमर अब्दुल्ला यांचे पत्नी पायल अब्दुल्लासोबतचे संबंध गेल्या १५ ते १६ वर्षांपासून बिघडले आहेत. उमर अब्दुल्ला यांनी क्रोर्याचा दाखला देत पत्नीपासून घटस्फोटाची मागणी केली होती.
advertisement
4/7
उमर अब्दुल्ला यांनी न्यायालयात आपलं लग्न १५ वर्षांपासून संपुष्टात आलं असल्याचं सांगितलं. १५ वर्षांपासून वेगळे राहत असल्याचंही त्यांनी संगितलं होतं. पायल अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला यांनी १९९४ मध्ये लग्न केलं होतं. दोघे २०११ मध्ये वेगळे झाले.
advertisement
5/7
राजकारणात येण्याआधी उमर अब्दुल्ला दिल्लीत ओबेरॉय हॉटेलमध्ये काम करत होते तिथेच त्यांची पायलशी ओळख झाली होती. आंतरधर्मीय लग्नामुळे राज्यात त्यांच्याविरोधात नाराजीही निर्माण झाली होती.
advertisement
6/7
उमर अब्दुल्ला लग्नानंतर चार वर्षांनी राजकारणात उतरले. तेव्हा पत्नी पायल त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत होत्या. पण लग्नाच्या १५ वर्षांनी त्यांच्यात दुरावा निर्माण झाला.
advertisement
7/7
उमर अब्दुल्ला आणि पायल यांना दोन मुलगे आहेत. उमर यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर पायल दिल्लीत राहतात. त्या ट्रॅव्हल बिझनेस करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Omar Abdullah Love Story : हॉटेलमध्ये ओळख, प्रेम, आंतरधर्मीय लग्न अन् आता घटस्फोटासाठी 15 वर्षांपासून कोर्टात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल