photos : सरपंचासह एकाच रात्री गायब झाले हजारो लोक, या गावाची अत्यंत रहस्यमयी कहाणी
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
कुलधरा हा जैसलमेर मधील एक समृद्ध असा परिसर होता. मात्र, आज याठिकाणची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. आजही याठिकाणी देशविदेशातील पर्यटक येतात. एकेकाळी समृद्ध असलेले हे गाव आज निर्जन का आहे, असे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.
advertisement
1/5

कुलधरा असे या गावाचे नाव आहे. हे गाव राजस्थान राज्यातील जैसलमेर शहरापासून जवळपास 20 किमी अंतरावर आहे. या गावाबाबत ऐकताच अनेकांना भीती वाटते. कुलधरा हा जैसलमेर मधील एक समृद्ध असा परिसर होता.
advertisement
2/5
मात्र, आज याठिकाणची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. आजही याठिकाणी देशविदेशातील पर्यटक येतात. एकेकाळी समृद्ध असलेले हे गाव आज निर्जन का आहे, असे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.
advertisement
3/5
कुलधरा गावाबाबत विविध माहिती मिळते. असे म्हटले जाते की, हे गाव एका रात्रीत खाली झाले होते. येथील जमीनदार सालिम सिंह हा सर्वसामान्य लोकांपासून चुकीच्या पद्धतीने व्याज वसूल करत होता. तसेच त्यांच्या महिला, मुलींवर वाईट नजरेने पाहायचा. अनेक दिवस गावकऱ्यांना याला विरोध केला. मात्र, त्याने न ऐकल्याने सरपंचासह येथील गावकऱ्यांनी गावच खाली केले.
advertisement
4/5
तर इतिहासकार नंद किशोर शर्मा यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, कुलधरा गावाची एक वेगळी कहाणी आहे. सालिम सिंह कर वसूली करायचा. तसेच लोकांचे शोषणही करायचा. यामुळे ब्राह्मण कुटुंबीयांना एकत्र एक योजना आखली. जेव्हा डाकूंची दहशत वाढली तेव्हा लोकांनी आपल्या सुरक्षेसाठी आणि समृद्धीसाठी हे गाव सोडले. सलीम सिंगसुद्धा हे गाव खाली करण्यास तितकाच दोषी आहे, याचा पुरावाही आहे.
advertisement
5/5
नंद किशोर शर्मा हे पुढे म्हणाले की, सर्व गावकऱ्यांनी एकाच रात्रीत गाव सोडल्याचा कोणताही पुरावा नाही. मात्र, हळूहळू 10 वर्षात तब्बल 25 ते 30 हजार घर खाली झाले. येथील लोकांनी दुसऱ्या ठिकाणी जाऊन, आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. एकेकाळी हा परिसर आणि संस्कृती आणि समृद्धीने भरलेला होता. मात्र, आज ही जागा अत्यंत निर्जनस्थळ बनले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
photos : सरपंचासह एकाच रात्री गायब झाले हजारो लोक, या गावाची अत्यंत रहस्यमयी कहाणी