2 ट्रकवर धडकली भरधाव इको, कारचा चक्काचूर एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील कपराडा तालुक्यात कुंभघाट येथे इको कार आणि दोन ट्रकच्या भीषण अपघातात आंबा जंगल गावातील एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू.
advertisement
1/6

एकाच कुटुंबातील सात जण प्रवासाला निघाले, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. काळानं झडप घातली आणि क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील कपराडा तालुक्यात शुक्रवारी भीषण अपघात झाला.
advertisement
2/6
हा अपघात इतका भीषण होता की संपूर्ण इको कारचा चुराडा झाला. तर ट्रकचंही मोठं नुकसान झालं. भरधाव कार आणि ट्रकने जोरदार धडक दिली. ही कार उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकवर जाऊन आदळली. एकाचवेळी हे दोन अपघात झाले ज्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे.
advertisement
3/6
एकाच कुटुंबातील सात जण असल्याची माहिती मिळाली आहे. पाच जणांचा अपघातादरम्यान मृत्यू झाला. तर दोघांचा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करेपर्यंत मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास कुंभघाट येथील डोंगरदऱ्यांच्या वळणावर घडली.
advertisement
4/6
कपराडा तालुक्यातील 'आंबा जंगल' गावातील सात जण कारने नाना पोंडाच्या दिशेला निघाले होते. घाट उतरत असताना मागून येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारवरील ताबा सुटला आणि ती समोर उभ्या असलेल्या एका ट्रकवर जाऊन आदळली. दोन ट्रकच्या मध्ये ही कार अक्षरशः चिरडली गेली.
advertisement
5/6
अपघाताचा आवाज एवढा मोठा होता की आसपासच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अन्य दोघांना तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आलं मात्र त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
6/6
घाट उतरताना गाडीच्या वेगावरचं अनियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कपराडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक एस. एल. वसावा यांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
2 ट्रकवर धडकली भरधाव इको, कारचा चक्काचूर एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू