विनायक चतुर्थी मुहूर्त -
फाल्गुन शुक्ल चतुर्थी प्रारंभ: 20 फेब्रुवारी, दुपारी 2:38 वाजता
फाल्गुन शुक्ल चतुर्थी समाप्ती: 21 फेब्रुवारी, दुपारी 1:00 वाजता
विनायक चतुर्थी पूजा मुहूर्त: सकाळी 11:27 ते दुपारी 1:00 वाजेपर्यंत
रवि योग: सकाळी 6:54 ते संध्याकाळी 7:07 पर्यंत
शुभ योग: पहाटेपासून दुपारी 3:51 पर्यंत
रेवती नक्षत्र: पहाटेपासून संध्याकाळी 7:07 पर्यंत
advertisement
चंद्रोदय वेळ: सकाळी 8:56 वाजता
चंद्रास्त वेळ: रात्री 10:16 वाजता
विनायक चतुर्थी पूजा मंत्र
1. ओम गं गणपतये नमः
2. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
विनायक चतुर्थी पूजा विधी -
विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि उपवास व गणेश पूजेचा संकल्प करावा. त्यानंतर दुपारी शुभ मुहूर्तावर गणपतीची स्थापना करावी. बाप्पाला पंचामृताने स्नान घालावे. त्यानंतर झेंडूची फुले, हार, अक्षता, शेंदूर, फळे, धूप आणि दीप अर्पण करून पूजा करावी.
गणपतीला दुर्वा अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. नैवेद्यासाठी मोदक, लाडू किंवा केळी अर्पण करावीत. गणेश चालीसाचे पठण करावे आणि विनायक चतुर्थीची व्रत कथा ऐकावी. त्यानंतर कापूर किंवा तुपाच्या दिव्याने आरती करावी. पूजेच्या शेवटी क्षमा प्रार्थना करून सुख-समृद्धीचे आशीर्वाद मागावेत. रात्री जागरण करावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान व दान करून उपवास सोडावा.
कारच्या डॅशबोर्डवर देवतांच्या मूर्ती लावणाऱ्यांना हे नियम माहीत हवेत; वेळीच..
॥ श्री गणपतीची आरती ॥
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥ १ ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ धृ. ॥
रत्नखचित फरा तुझ गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुमकुमकेशरा ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
रुंजुंझाती नूपुरे चरणी घागरिया ॥ २ ॥
जय देव जय देव...
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥ ३ ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥
