TRENDING:

सह्याद्रीच्या कुशीतून 'लोकल' सुसाट, पनवेल-कर्जत अंतर आता अवघ्या काही मिनिटांत; कधी सुरू होणार सेवा?

Last Updated:
Panvel-Karjat Railway Corridor : पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे कॉरिडॉरअंतर्गत सह्याद्रीच्या डोंगररांगांत उभारण्यात आलेल्या रेल्वे बोगद्यांचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. पण लवकरच हा मार्ग सुरु होऊन प्रवास अतिशय सोपा होणार आहे.
advertisement
1/7
सह्याद्रीच्या कुशीतून 'लोकल' सुसाट, पनवेल-कर्जत अंतर आता अवघ्या काही मिनिटांत
मुंबई लोकलने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याला थेट उपनगरी रेल्वेने जोडणाऱ्या पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे कॉरिडॉरचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
advertisement
2/7
या प्रकल्पाचे सुमारे 95 टक्के काम पूर्ण झाले असून राहिलेले काम जलद गतीने सुरू आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांतून मार्ग काढताना या प्रकल्पात उभारण्यात आलेले तीन रेल्वे बोगदे हे सर्वाधिक महत्त्वाचे आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक काम ठरले आहे.
advertisement
3/7
मुंबई रेल विकास महामंडळामार्फत मुंबई अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रकल्प-3 अंतर्गत हा मार्ग उभारला जात आहे. पनवेल ते कर्जत दरम्यान 29.6 किलोमीटर लांबीचा दुहेरी रेल्वेमार्ग तयार केला जात असून यासाठी सुमारे 2,783 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
advertisement
4/7
सह्याद्रीच्या खडकाळ भागातून मार्ग काढताना एकूण तीन बोगदे तयार करण्यात आले असून त्यांची एकत्रित लांबी सुमारे 3,206 मीटर आहे. त्यापैकी वावरले येथील 2.639 किलोमीटर लांबीचा बोगदा हा सर्वात मोठा असून तो मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा मानला जातो.
advertisement
5/7
या बोगद्यांमध्ये पारंपरिक खडीऐवजी खडी न वापरता नवीन प्रकारचे रेल्वे रुळ बसवले जात आहेत. त्यामुळे गाड्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, स्थिर होणार आहे तसेच देखभालीचा खर्चही कमी राहणार आहे.
advertisement
6/7
बोगद्यांमध्ये आरसी बॉक्स संरचना, प्रभावी ड्रेनेज व्यवस्था, प्रकाश आणि हवा ये-जा करण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे. पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी विशेष निचरा व्यवस्था करण्यात आली आहे.
advertisement
7/7
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई, पनवेल, कर्जत आणि रायगड परिसरातील प्रवाशांना थेट उपनगरी रेल्वे सेवा मिळणार असून मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
सह्याद्रीच्या कुशीतून 'लोकल' सुसाट, पनवेल-कर्जत अंतर आता अवघ्या काही मिनिटांत; कधी सुरू होणार सेवा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल