TRENDING:

Child Care Tips: लहान मुलाला वारंवार पोटदुखी होतेय? या टिप्स फॉलो केल्यास मिळेल लगेच आराम

Last Updated:
Child Care Tips: बाळाचा जन्म जितका आनंद देणारा असतो तितकाच आव्हानात्मक देखील वाटतो. मुलांचं संगोपन करण्यात चांगलीच कसरत होते. विशेषत: लहान मुलांना पोटदुखीची समस्या निर्माण झाल्यास ती पालकांना लवकर समजत नाही. जर मुलं पोटदुखीमुळे रडत असेल तर त्यावर घरगुती उपाय करता येतात.
advertisement
1/5
लहान मुलाला वारंवार पोटदुखी होतेय? या टिप्स फॉलो केल्यास मिळेल लगेच आराम
अनेकदा लहान मुलांना पोटदुखीचा त्रास जाणवतो. हा त्रास साध्या अपचनामुळेही होऊ शकतो, तर कधी गंभीर आजाराचं लक्षण देखील असू शकतो. अपचन, दूषित अन्न किंवा पाणी, जास्त खाणं, जंत-कृमी, गॅस किंवा बद्धकोष्ठता ही लहान मुलांच्या पोटदुखीची सर्वसाधारण कारणं आहेत.
advertisement
2/5
काही वेळा मात्र अपेंडिसायटिससारख्या आजारामुळेही मुलांच्या पोटात तीव्र वेदना निर्माण होतात. त्यामुळे पालकांनी प्रत्येक वेळेस या त्रासाकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. घरच्या घरी काही साधे उपाय करून मुलांना तात्पुरता आराम मिळवून देता येतो. हलकं कोमट पाणी पाजल्यास अपचन आणि गॅस यामध्ये दिलासा मिळतो.
advertisement
3/5
मुलांच्या आहारात खिचडी, दही-भात, सूप यांसारखं पचायला हलकं अन्न असावं. तेलकट, मसालेदार, तळकट आणि जंक फूड टाळल्यास पोटदुखी पुन्हा उद्भवण्याची शक्यता कमी होते. योग्य आहारामुळे मुलांच्या पचनक्रियेला मदत होते आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहतं.
advertisement
4/5
पोटदुखी कमी करण्यासाठी काही घरगुती उपायही उपयुक्त ठरतात. कोमट पाण्यात हिंग विरघळवून पोटावर लावल्यास पोटातील गॅस आणि वेदना कमी होतात. ओव्याचा काढा पाजल्यास पचन सुधारतं आणि पोट हलकं वाटतं. अशा नैसर्गिक उपायांचा वापर केल्याने मुलांना वेदना कमी होतात तसेच औषधांचा अतिरेक टाळता येतो.
advertisement
5/5
याशिवाय पोटदुखी असताना मुलांना पुरेसा आराम आणि झोप मिळणं महत्त्वाचं आहे. खेळणे, धावपळ किंवा जड अन्नामुळे त्रास वाढतो. योग्य झोप आणि विश्रांतीमुळे शरीराला बळ मिळतं आणि पचनक्रियेलाही मदत होते. तरीदेखील वारंवार पोटदुखी होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/फोटो गॅलरी/
Child Care Tips: लहान मुलाला वारंवार पोटदुखी होतेय? या टिप्स फॉलो केल्यास मिळेल लगेच आराम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल